सोमवारपासून (२८ जून) झालेल्या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धत म्हणजेच विम्बल्डनमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे. रोहन बोपन्ना व दिवीज शरण या पुरुष जोडीला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, चार वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या सानिया मिर्झाने पहिल्या फेरीचा अडथळा आरामात पार करत आपली अमेरिकन साथीदार बेथानी मॅटेक-सॅण्ड्ससोबत महिला दुहेरीची दुसरी फेरी गाठली.
सानियाचे यशस्वी पुनरागमन
भारताची आजवरची सर्वोत्तम महिला टेनिसपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सानिया मिर्झाने तब्बल चार वर्षानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तिने महिला दुहेरीत आपली अमेरिकन साथीदार बेथानी मॅटेक-सॅण्ड्ससोबत पहिल्या फेरीत सहाव्या मानांकित डेसिरे क्राउजिक आणि एलेक्सा गुआराची जोडीवर मात केली. एक तास २७ मिनिटे चाललेल्या सामन्यात सानिया-बेथानी जोडीने ७-५, ६-३ असा विजय मिळवला.
https://www.instagram.com/p/CQyqH41l9zM/?utm_medium=copy_link
सानियाच्या मुलाने वाढविला उत्साह
या सामन्यात सानिया-बेथानी जोडीला प्रोत्साहन देण्यासाठी एक खास चाहता हजर होता. हा चाहता म्हणजे सानियाचा दोन वर्षाचा मुलगा इजान होय. सामन्यानंतर सानियाने इंस्टाग्रामद्वारे इजानसोबतचे एक छायाचित्र शेअर करताना, ‘पहिली फेरी, हसू, स्पायडरमॅन आम्हाला विम्बल्डनमध्ये प्रोत्साहन देताना’ अशा आशयाचे कॅप्शन लिहिले. या पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने खूप सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. त्यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
मिश्र दुहेरीत होणार भारतीय जोड्यांचा सामनाचा
विम्बल्डन २०२१ च्या पाचव्या दिवशी मिश्र दुहेरीत भारतीय जोड्या आमने-सामने येणार आहेत. अनुभवी सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडीचा सामना अंतिम क्षणी स्पर्धेत स्थान मिळालेल्या अंकिता रैना व रामकुमार रामनाथन या दुसऱ्या भारतीय जोडीशी होईल. विशेष म्हणजे सानिया आणि अंकिता २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकीयो ऑलिंपिकमध्ये महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
–“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया
–‘भारतीय कर्णधाराला मिळणार नाही टी२० विश्वचषकात संधी,’ माजी क्रिकेटपटूचे परखड भाष्य