---Advertisement---

सानिया मिर्झाचा मेसट ओझीलला पाठिंबा, वंशभेदाचा केला निषेध

---Advertisement---

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जर्मनीचा फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठिंबा दर्शवत वंशभेदाचा निषेध केला आहे.

जर्मनीच्या २९ वर्षीय मेसट ओझीलने रविवारी (22 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

जर्मन चाहत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वंशभेदाच्या टिकेमुळे मेसट ओझीलने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

मुळचा तुर्कीचा असलेल्या मेसट ओझीलने, तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे ओझीलवर सातत्याने वंशभेदी टिका होत होती.

टिकारांच्या या टिकेला वैतागून २९ वर्षीय मेसट ओझीलने आंतरराष्ट्रीय फुटबॉमधून आपण निवृत्त होत असल्याची ट्विटरवरुन घोषणा केली होती.

मेसट ओझीलच्या या निर्णयामुळे सानिया मिर्झाने मेसट ओझीलसाठी दुख: व्यक्त केले.

सानियाने तिच्या ओझील आणि वंशभेदाविषयीच्या भावना ट्विटरवरुन व्यक्त केल्या.

“एक खेळाडू आणि प्रथम माणूस म्हणून मला मेसट ओझील बद्दलच्या घटनेमुळे दुख: झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत वंशभेदाला थारा दिला जाणार नाही.” या शब्दात सानियाने मोझीलला पाठिंबा देत वंशभेदाचा निषेध केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानी गोलंदाजाची चालाखी, पहा कसे केले सेलिब्रेशन

-एमएस धोनीची फॅमीली मेंबर करत आहे मुंबई इंडियन्ससाठी चिअर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment