भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा सोमवारी (१५ नोव्हेंबर) वाढदिवस होता. सानियाने आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला. सानिया मिर्झा ही गेल्या दोन दशकांत भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. सानियाने आपल्या खेळाने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकबरोबर तिच्या लग्नानंतर तिच्यावर टीकाही झाली होती. इम्रान प्रतापगढ़ी या कवीनेही तिच्यावर कविता लिहिली होती. सानियाच्या लग्नानंतर जे काही लिहिले होते त्यावरून इम्रान यांच्यावर बरीच टीका झाली.
इम्रान प्रतापगढ़ी यांनी सानियाच्या लग्नानंतर काही शेर लिहिले होते. यामध्ये जे काही बोलले गेले, त्यातील त्यांच्या विचारसरणीवर आजही टीका केली जाते. लोक आजही यावर प्रश्न उभे करतात की, कोणी कोणाला कसे काय सांगू शकते की, तुम्ही कुणाशी लग्न करावे किंवा करू नये. मात्र, नंतर इम्रान यांनी ही केवळ कविता आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. इम्रानने हे लिहिले होते की-
कुछ ऐसा प्यार तुम हिन्दुस्तान से करतीं
कोई ना रोकता शादी भी शान से करतीं।
शोएब जैसा पड़ोसी का हाथ क्यों थामा
शादी करनी थी, युसूफ पठान से करतीं।।
इम्रान यांनी आपल्या कवितेत सानिया मिर्झाच्या कपड्यांवरही भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, जर त्याने आईला सानियाशी लग्न करण्यास सांगितले असते, तर तिने तिला तिच्या कपड्यांमुळे तिला नाकारले असते. कारण ती भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालत नाही.
कवी इम्रान प्रतापगढ़ी हे काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत. इम्रान प्रतापगढ़ी यांना २०१९ मध्ये काँग्रेसने मुराबादाबादमधून लोकसभेचे तिकीटही दिले होते, त्यात त्यांचा पराभव झाला होता. इम्रान यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारकाची भूमिकाही बजावली आहे. मात्र, तरीही त्यांच्या कवितेबाबत आजही प्रश्न उभे केले जातात.
सानिया मिर्झाने आपल्या टेनिस कारकिर्दीत खूप यश मिळवले आहे. सानियाने वयाच्या १४ व्या वर्षी टेनिसमध्ये पदार्पण केले. १९९९ मध्ये, तिने एकेरी आणि दुहेरीमध्ये पाकिस्तानमध्ये ज्युनियर चॅम्पियनशिप जी-५ प्रकारात विजय मिळवला होता. सानियाने २००३ मध्ये विम्बल्डनमध्ये दुहेरी प्रकारात विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २००९ मध्ये, सानिया मिर्झा ग्रँड स्लॅम जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली होती.
सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. दोघांनी २०१० मध्ये लग्न केले होते. २०१८ मध्ये सानियाने मुलगा इझानला जन्म दिला. सानियाने आई झाल्यानंतर तीन वर्षांनी टेनिसमध्ये पुनरागमन केले आणि युक्रेनच्या नादिया किचनोकसह होबार्ट आंतरराष्ट्रीय महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सानियाला २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल न्यूझीलंडचे अभिनंदन? ‘या’ भारतीय क्रिकेटरने ट्वीटमध्ये केली मोठी गडबड
भारीच! जोश हेडलवूड ‘हा’ विक्रम करणारा युवराज सिंगनंतर जगातील दुसराच खेळाडू