टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाने दमदार सुरुवात केली आहे. पाकिस्तान संघाने भारतापाठोपाठ न्यूझीलंडला देखील पराभवाची धूळ चारली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या विजयाचा हिरो असलेला शोएब मलिक मैदानावर चौकार-षटकार मारत होता. दुसरीकडे पत्नी सानिया मिर्झाही प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. आपला पती आणि त्याच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी सानिया यूएईला पोहोचली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद हाफीजने त्याला सानिया मिर्झाने कशी मदत केली, हे सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.
हाफिजची पत्नी नाझियाचा बुधवारी (२७ ऑक्टोबर) वाढदिवस होता आणि तो हे विसरला होता. पण टेनिस स्टार सानिया मिर्झाने वेळेत केक मिळवून त्याला वाचवले आणि त्याच्यासोबत वाढदिवसही साजरा केला. मंगळवारी टी२० विश्वचषकात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. यासह पाकिस्तानचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या शानदार विजयानंतर खेळाडूंनी स्टेडियममध्ये सेल्फी काढून आनंद साजरा केला.
यानंतर हाफिजने आपल्या पत्नीचा वाढदिवसही शारजाहमध्ये मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा केला. पण तो केक आणायला विसरला. पण, सानिया मिर्झाने याची सर्व व्यवस्था केली आणि हाफिजच्या पत्नीचा वाढदिवस साजरा केला.
हाफिजने त्याच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि सानियाच्या मदतीबद्दल आभार देखील मानले आहेत.
Happy birthday to my wife @naziahafeez8 i forgot but thanks to rescue angel @MirzaSania to arrange birthday cake on time. pic.twitter.com/jDSCLtyV8l
— Mohammad Hafeez (@MHafeez22) October 26, 2021
तत्पूर्वी, न्यूझीलंडने दिलेल्या १३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने पहिल्या ५ षटकात २८ धावा करून एकही विकेट गमावली नाही. बाबर आझम (९) सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टिम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर फखर जमान (११) लयीत दिसला नाही. त्याने १७ चेंडूंचा सामना केला. त्याला लेगस्पिनर ईश सोधीने बाद केले. मोहम्मद हाफीजने (११) षटकार ठोकून चांगली सुरुवात केली. पण डेव्हॉन कॉनवेने त्याचा अप्रतिम झेल पकडत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान ३३ धावा करून बाद झाला. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ५ चौकार मारले. इमाद वसीम बोल्टच्या चेंडूवर ११ धावा काढून बाद झाला. अखेरच्या ५ षटकात संघाला ४४ धावा करायच्या होत्या. १६व्या षटकात सोधीने अवघ्या ७ धावा दिल्या. १७ व्या षटकात टीम साऊदीने १३ धावा दिल्या. त्याला आसिफने २ षटकार मारले. शेवटच्या तीन षटकात पाकिस्तानला २४ धावा करायच्या होत्या.
डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने १८व्या षटकात १५ धावा दिल्या. मलिकने या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. अखेर शोएब मलिकने नाबाद २६ आणि आसिफ अलीने नाबाद २७ धावा करत संघाचा विजय निश्चित केला. दोघांनी २३ चेंडूत ४८ धावांची नाबाद भागीदारी केली. यामुळे विजयासह पाकिस्तानचा संघ पुन्हा सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात अव्वल स्थानी पोहोचला.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशच्या फलंदाजाला स्कूप शॉट पडला महागात, असा झाला झेलबाद; पाहा व्हिडिओ