ऑस्ट्रेलियन ओपन 2023 हे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम होते, जिथे तिला यापूर्वी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सानिया आणि तिचा जोडीदार रोहन बोपण्णा यांना विजेतेपदाच्या लढतीत लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राझीलच्या जोडीकडून 6-7, 2-6 असा पराभव पत्करावा लागलेला. या पराभवाने सानिया मिर्झाची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपुष्टात आली. ग्रँडस्लॅमला निरोप देताना सानियाला अश्रू अनावर झाले होते. ग्रँडस्लॅममधून निवृत्ती घेतल्यानंतर तिच्या पती शोएबने एक भावनिक पोस्ट केली होती. त्यावर सानियाने प्रत्युत्तर दिले आहे.
ग्रँडस्लॅममधून (Grand Slam) निवृत्ती घेतल्यानंतर तिने पती क्रिकेटर शोएब मलिकला (Shoaib Malik) प्रत्युतर दिले आहे. सानियाने (Sania Mirza) स्मितहास्याचा इमोजी देऊन शोएबचे आभार मानले. खरं तर, शोएब मलिकच्या पोस्टला सानियाने दिलेले उत्तर देखील चर्चेत आहे कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत आहेत.
शोएबने सानियाचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या ट्विटमध्ये सानियाला (Sania Mirza) तिच्या शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, ‘क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी तू खूप महत्वाची आशा आहेस. तू तुझ्या कारकिर्दीत जे काही मिळवले आहे त्याबद्दल तुझा खूप अभिमान आहे. तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस, खंबीर राहा. अतुलनीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा …’
– You are the much needed hope for all the women in sports. Super proud of you for all you have achieved in your career. You're an inspiration for many, keep going strong. Many congratulations on an unbelievable career… pic.twitter.com/N6ziDeUGmV
— Shoaib Malik ???????? (@realshoaibmalik) January 27, 2023
काही काळापूर्वी बातमी आली होती की सानिया (Sania Mirza) आणि शोएब (Shoaib Malik) वेगळे झाले आहेत आणि दोघेही वेगळे राहत आहेत. मात्र, याबाबत दोन्ही बाजूंकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
दुबई टेनिस ही चॅम्पियनशिप (Dubai Tennis Championship) सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सानिया अखेरच्या वेळी खेळताना दिसणार आहे. 36 वर्षीय सानिया मिर्झाही दुहेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी राहिली आहे.
सानिया मिर्झाला खेळातील तिच्या अतुल्य योगदानासाठी भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण पुरस्कार (2016) या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत 6 मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. (Sania Mirza Reply Husband Shoaib Malik After Australian Open And Grandslam Retirement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास
BIG BREAKING! पोरींनी रचला इतिहास, U19 टी20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव





