भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक वेगळे झाले आहेत. एप्रिल 2010 मध्ये दोघांनी लग्न केले होते. 13 वर्षांच्या संसारानंतर अखेर त्यांचा घटस्फोट झाल्याची माहिती शनिवारी (20 जानेवारी) समोर आली. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण शोएब आणि सानिया नक्की केव्हा वेगळे झाले, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रमाची स्थिती होती. अशात आता दोघांच्या घटस्फोटाबाबत महत्वाची माहिती समोर येथ आहे.
सानिया मिर्झा (Sania Mirza) आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खूप कमी गोष्टी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने वैयक्तिक आयुष्य नेहमीच पडद्यामागे ठेवले आहे. रविवारी (21 जानेवारी) सानियाचे वडील इब्राम मिर्झा यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली. त्याआधी या पोस्टमध्ये सानिया आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाबाबत लिहिले गेले. पोस्टमधील माहितीनुसार दोघांच्या घटस्फोटाला काही महिन्यांचा काळ होऊन गेला आहे. ही पोस्ट शेअर करण्याआधी इम्रान यांनी हा घटस्फोट नसून ‘खुला’ असल्याचेही स्पष्ट केले होते. इस्लाम धर्मात महिलांना एकतर्फी घटस्फोटाचा अधिकार दिला गेला आहे. यालाच खुला असे म्हटले जाते.
View this post on Instagram
रविवारी इम्रान या शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सानिया नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य लोकांच्या नजरेपासून दूर ठेवते. पण आता हे सांगणे गरजेचे झाले आहे की, काही महिन्यांआधीच तिचा आणि शोएबचा घटस्फोट झाला आहे. ती शोएबला त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे. तिच्या आयुष्यातील या संवेदनशील काळात चाहत्यांना एक विनंती आहे. कुठल्याच चुकीच्या माहितीला बळी पडू नका आणि गोपनीयतेचा सन्मान करा.” (Sania Mirza’s father’s information about her breakup with Shoaib Milk)
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडला तगडा झटका! कसोटी मालिकेपूर्वी धडाडीचा फलंदाज मायदेशी परतला, वाचा काय आहे कौटुंबीक कारण
डेटिंगच्या चर्चां सुरू असतानाच सारा आणि गिलची बहीण सोबत, लेट नाईटचा व्हिडिओ व्हायरल