भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा आहे. भारतीय क्रिकेटपटूंना जगभरातून प्रेम मिळते. इतकेच नाही, तर ते त्यांच्या खास खेळी, विक्रम यांसारख्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरही खेळाडूंचा चांगलाच वावर असतो. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चर्चेत असतात. मात्र, जेव्हा एखाद्या खेळाडूची पत्नी एखादी पोस्ट लाईक किंवा त्यावर कमेंट करते, तेव्हा सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले जाते. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन हिने लाईक केलेली पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
संजना गणेशनने केलेला एक लाईक आला अंगाशी
खरं तर असे अनेकदा झाले आहे की, नेटकरी क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या सोशल मीडिया पोस्टचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल करतात. यामुळे त्यांना काहीही पोस्ट करण्यापूर्वी विचार करावा लागतो. अशातच जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही सोशल मीडियामुळे चर्चेत आली आहे.
संजनाने सोशल मीडियावर जी रिऍक्शन दिली आहे, त्यामुळे रोहित शर्मा याच्या चाहत्यांना कदाचित हे आवडलेले नाहीये. संजनाने नुकतीच एक पोस्ट लाईक केली होती, ज्यामध्ये सांगण्यात आले की, विराट कोहली (Virat Kohli) हा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यापेक्षा चांगला खेळाडू आहे.
चाहत्याच्या एका पोस्टला संजनाचा पाठिंबा
खरं तर, @iimcomic या युजरनेम असलेल्या एका कॉमेडियनने इंस्टाग्रामवर एक ट्वीट पोस्ट शेअर केली आहे. असे दिसते की, संजनाने यास पाठिंबा दिला असून तिला ही पोस्ट आवडलीये. संजनाला आवडलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहे.
Sanjana Ganesan liked post saying Virat Kohli is better than Rohit Sharma pic.twitter.com/dqRHTacutI
— Behind Cricket (@behindCric8) June 1, 2022
जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळतो. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच वेळी, रोहित भारतीय संघाचा कर्णधारही आहे. विराट आणि रोहित यांच्यात सर्वोत्तम फलंदाज कोण यावर नेहमीच शाब्दिक वाद होत असतात. रोहित शर्मा जेव्हापासून भारताकडून सलामीवीर म्हणून खेळत आहे, तेव्हापासून त्याची कारकीर्द उंचावली आहे यात शंका नाही.
रोहितने त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वय वाढलं, पण धार गेली नाही! जेम्स अंडरसनने न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत नावावर केला भीमपराक्रम
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर