इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ चे आयोजन यावर्षी एप्रिल-मे महिन्यात करण्यात येणार आहे. तसेच येत्या २० फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठी एकूण १०९७ खेळाडूंनी नाव नोंदविले आहे. यात २८३ परदेशी आणि ८१४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
याच हंगामची पूर्वतयारी म्हणून सगळेच संघ आपल्या ताफ्यात महत्वाच्या व्यक्तींचा समावेश करून घेत आहेत. अशातच गेल्या १३ सत्रापासून आयपीएलच्या विजेतेपदापासून वंचित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (आरसीबी) संघाने १४ व्या सत्रासाठी संजय बांगर यांची फलंदाजी सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
मागील हंगाम होता निराशाजनक
आरसीबी संघाला गेल्या १३ सत्रात एकदाही विजेतेपद मिळविण्यात यश नाही आले आहे. यामुळेच आरसीबीने यंदाच्या सत्रात संघात नवीन प्रशिक्षकांचा समावेश केला आहे. २०२०च्या आयपीएल मध्ये आरसीबीने सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परंतु नेट रनरेट मुळे संघ बाद फेरी खेळण्यासाठी पात्र ठरला होता. मात्र बाद फेरीतील पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते.
अनुभवी संजय बांगर यांची नियुक्ती
त्यामुळे आता मागील हंगामातील कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आरसीबीने अनुभवी संजय बांगर यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. आरसीबी संघाने आपल्या ट्विट करत ही माहिती दिली. आपल्या ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, “आम्ही आयपीएल २०२१ साठी फलंदाजी सल्लागार म्हणून आरसीबीच्या कुटुंबात संजय बांगर यांचे स्वागत करतांना खूप आनंदी आहोत. तुमचे स्वागत आहे, कोच.”
We are delighted to welcome Sanjay Bangar to the RCB Family as a batting consultant for #IPL2021! 🤩
Welcome aboard, Coach! 🤜🏻🤛🏻#PlayBold #WeAreChallengers #NowARoyalChallenger pic.twitter.com/SWKLthSyXl
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 10, 2021
कर्णधार विराट कोहली आणि संजय बांगर यांचे संबंध चांगले आहेत. तसेच २०२१ च्या आयपीएल लिलावापूर्वी संजय बांगर यांना संघात समाविष्ट करून घेणे, आरसीबी संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. लिलाव प्रक्रिया सुरू असताना कोणता खेळाडू संघात समाविष्ट करावा हे सांगण्यास ते मदत करू शकतील. याव्यतिरिक्त ते आरसीबीच्या फलंदाजी क्रम मध्ये ही फेरबदल करू शकतील. ज्याचा फायदा आरसीबी संघाला निश्चितच होईल.
महत्वाच्या बातम्या:
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समीकरणांवर विराट कोहलीची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला
दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघासमोर आहेत या चार समस्या
या ७ खेळाडूंनी एक दोन नाही तर सलग तीन कसोटीत जिंकलाय सामनावीर पुरस्कार