भारत-इंग्लैंड यांच्यातील कसोटी मालिकेला बुधवारपासून (१ ऑगस्ट) प्रारंभ होत आहे.
या कसोटी मालिकेत दोन्ही संघाची कामगिरी त्यांच्या कर्णधारांवर अवलंबून आहे.
एकीकडे विराटने इंग्लंड सोडून जगभरात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर जो रुटनेही सर्व जगभरात चांगली कामगिरी केली आहे.
२०१४ चा इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात निराशाजनक कामगिरी झाली होती.
२०१४ च्या दौऱ्यात कोहलीची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. त्याला जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीपुढे लोटांगण घालावे लागले होते. त्याला पाच सामन्यात १३.४० सरासरीने फक्त १३४ धावा करता आल्या होत्या. त्याला अँडरसनने चार वेळा बाद केले होते.
विराटची या दौऱ्यात कामगिरी चांगली व्हावी यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी, जेम्स अॅंडरसनचा यशस्वीपणे सामना कसा करावा याबद्दल विराटला सल्ला दिला मात्र हा सल्ला त्यांना महागात पडला आहे.
“ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूकडे विराटने चुकुनही पाहू नये. त्याने दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑफ स्टंपवरील चेंडूवर चांगले ड्रइव्ह मारले. मात्र ज्यावेळी हा चेंडू स्विंग होतो त्यावेळी तो सतत पायचित होतो.” असे मांजरेकर एका क्रिकेट शोमध्ये म्हणाले.
Here’s what Virat could do against Anderson.https://t.co/txEtKH1fmR
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 28, 2018
मात्र विराटच्या चाहत्यांनी माजरेकरांना या सल्यांनंतर ट्विटरवर चांगलेच धारेवर धरले आहे.
Hey bhagwan isko ar Akash chopra ko uthakar aisi jagah fek do jaha par inke muh ban ho
— R. (@engineerdhir) July 28, 2018
Hey thats awesome. In next episode, watch Manjrekar give tips to Roger Federer on how to succeed at Wimbledon next year.
— zorba (@DinoRamblings) July 28, 2018
What was your average in England . Hope you had played test cricket there.
— Bangalorean (@disgustedbang) July 28, 2018
Agar yeh hi cheez apne ki hoti to aap bahot kamyab hote Sanjayji
— MahiWay (@phimanshu07) July 28, 2018
Man are you really crazy? what sense you think you are expert than @imVkohli ? Stop all these nonsense advises. Doesn't really going to have any impact. Seems like speaking for sake to stay on the run for commentator as sky and other broadcasts sidelined you.
— Harry (@PatrickHaris) July 29, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियातील ‘तिल्ली’ हे प्रकरण तुम्हाला माहीत आहे का?
–भारताची यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी कमी – झहीर खान