साउथम्प्टनच्या मैदानावर येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. मुख्य बाब म्हणजे त्यांनी या संघात दोन दिग्गज खेळाडूंना स्थान दिले नाहीये.
इएसपीएन क्रिकइन्फोसोबत चर्चा करताना संजय मांजरेकर यांनी म्हटले की,”इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजीच्या बाबतीत, ईशांत शर्मा ऐवजी मोहम्मद सिराज जास्त प्रभावी ठरू शकतो. परंतु याची शक्यता खूप कमी आहे की, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल.”
संजय मांजरेकर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये, एकमात्र फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनची निवड केली आहे. त्यांनी फॉर्मात असलेल्या रविंद्र जडेजाला आपल्या संघात स्थान दिले नाहीये. महत्त्वाचे म्हणजे, मांजरेकरांनी यापुर्वी बऱ्याचदा जडेजाच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे जडेजाला संघाबाहेर करणे चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
तसेच वेगवान गोलंदाजांमध्ये त्यांनी ईशांत शर्माला आपल्या संघात स्थान दिले नाहीये. त्यांनी ईशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनाही त्यांनी आपल्या संघात जागा दिली आहे.
याखेरीज संजय मांजरेकर यांनी सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना स्थान दिले आहे. तसेच मध्यक्रमात त्यांनी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली,अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांना निवडले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारीला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे.(Sanjay Manjrekar choose his playing 11 for world test championship final)
संजय मांजरेकर यांनी निवडलेला ११ खेळाडूंचा संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हनुमा विहारी, आर अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
विंडिजविरुद्ध बरसले होते ऑस्ट्रेलियाचे जाबाज, एकाच डावात ५ शतकांसह चोपल्या होत्या ७५८ धावा
‘बंदीपासून वाचण्यासाठी अश्विन क्रिकेटपासून दूर गेला,’ माजी पाकिस्तानी गोलंदाजाचा गंभीर आरोप
अंडी-ब्रेड, डिडिएलजे अन् बरंच काही! भारतीय खेळाडूंचा ‘रॅपीड फायर’ सेशन बनवेल तुमचाही दिवस