---Advertisement---

टी२०मध्ये कोहलीपेक्षा एबी डिव्हिलियर्सच भारी, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य!

On: बुधवार, मे 9, 2018 2:45 PM
---Advertisement---

मुंबई | विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे जगातील दोन दिग्गज खेळाडू हे सध्या राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघातून खेळत आहे. या दोन खेळाडूंमध्ये कोण मोठे खेळाडू याबद्दल कायमच चर्चा होतात.

परंतु क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात कोण कुणापेक्षा चांगल आहे याच विश्लेषण भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकरने केले आहे.

“दोघांच्याही कसोटी कारकिर्दीचा विचार केला तर त्यात जास्त वाद होणार नाहीत. माझ्यासाठी विराट हा एबी डिव्हिलियपेक्षा चांगला फलंदाज आहे. वनडेत विराट हा जगातील सार्वकालिन महान खेळाडूंमध्ये येतो. तर टी२०मध्ये मात्र एबी डिव्हिलिय हा विराटपेक्षा नक्कीच उजवा आहे.” असे ते ESPNcricinfo वर एका शोमध्ये म्हणाले.

Read: मी अंबाती रायडूऐवजी रहाणेला वनडे संघात घेतल असतं- सौरव गांगुली

याच शोमध्ये शाॅन टेटने मात्र विराटहा टी२०मध्येही सरस असल्याचे म्हटले आहे.

“एबी डिव्हिलिय गोलंदाजांना थोडीतरी संधी देतो. विराट मात्र संधी खुपच कमी वेळा देतो. मी दोघांनाही गोलंदाजी केली आहे. त्यांना गोलंदाजी करणे कठीण आहे. विराटला गोलंदाजी करणे हे महाकठीण काम आहे. त्याच्या फलंदाजीत कमतरता दिसत नाही. मात्र एबी डिव्हिलियर्स मात्र कधी कधी गोलंदाजांना संधी देतो. ” असे टेट म्हणाला.

Read- नाबाद ९५ धावा करुनही केएल राहुलच्या नावावर झाला नकोसा असा विक्रम

जेव्हा संघ हा प्रचंड दबावात असतो तेव्हा एबी डिव्हिलियर्सची फलंदाजी बहरते. त्याची फलंदाजी पारंपारिक नाही. फलंदाजी करताना एबी डिव्हिलियर्स जे वेगवेगळे फटके मारतो ते अफलातून असतात. जिथे विराट मला कमी पडतो असे वाटते. ” असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले.

टी२० हा ताकदीचा खेळ आहे आणिआयपीएलच्या या मोसमात एबी डिव्हिलियर्सने तब्बल १११ मीटर लांब षटकार मारला आहे असेही ते पुढे म्हणाले.

Read-एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment