---Advertisement---

एकाच वेळी विराट दोन सामने कसे खेळणार!

On: बुधवार, मे 9, 2018 11:16 AM
---Advertisement---

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा संपुर्ण जून महिना सरे या इंग्लिश काऊंटी संघाकडून खेळणार असल्याचे तीन दिवसांपुर्वी घोषीत करण्यात आले. मात्र या खेळाडूची आता आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

आता भारतीय क्रिकेट बोर्ड याबद्दल काय निर्णय घेते हे पहावे लागेल.

याबद्दल निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांना विचारले असता त्यांनी याबद्दल बीसीसीआयचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांनी विचारा असे म्हटले आहे.

Read- केएल राहुलची कोण आहे ही जबरा फॅन

दुसऱ्या बाजूला जेव्हा हा प्रश्न माध्यमांकडून अमिताभ चौधरी यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थोडी वाट पहा सर्व ठिक होईल असे सांगितले.

गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य देणार आहे. ज्याचा उपयोग त्याला निश्चित आगामी दौऱ्यात होणार आहे.

कोहलीच्या सरेकडून खेळण्याची जोरदार चर्चा सध्या भारतात होत आहे. भारताचा एवढा मोठा स्टार आणि व्यस्त खेळाडू काऊंटी खेळत असल्यामुळे भारताप्रमाणेच याची इंग्लंडसह क्रिकेट विश्वात मोठी चर्चा आहे.

Read- अंडर १९ वर्ल्डकप स्टार पृथ्वी शाॅ, शुबमन गिलला टीम इंडिया अ कडून संधी

संपुर्ण जुन महिना हा खेळाडू सरेकडून खेळणार असल्याची घोषणा झाल्यामुळे या काळात जे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत त्यातही हा खेळाडू भाग घेणार नाही असे बोलले जात होते.

सरे ९-१२ जुन या काळात हॅपशायर, २०-२३ जुन सोमरसेट तर २५-२८ जुन याॅर्कशायरसोबत सामने खेळणार आहे. परंतु भारताचा आयर्लंडबरोबर २ टी२० सामने खेळणार आहे.

या दौऱ्यात पहिला सामना २७ जून तर दुसरा सामना २९ जून रोजी होणार आहे त्यामुळे तो या दोन सामन्यालाही मुकणार आहे.

त्यामुळे सरेचा जून महिन्यातील सामना आणि भारताच्या या दोन टी२० यांच्या तारखा एकाच वेळी येत आहेत.

Read-इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment