सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यातील भारतीय संघाच्या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आक्रमक भूमिकेत दिसला. सामन्यात जसप्रीत बुमराहने जेम्स अंडरसन फलंदाजी करत असताना त्याला एकापाठोपाठ एक बाउंसर चेंडू टाकताना दिसला होता. याबाबत भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू मांजरेकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या लेखात लिहिले आहे की, “जेव्हा जसप्रीत बुमराह लागोपाठ शाॅर्ट चेंडूने ११ व्या क्रमांकावर फलंदीजी करायला आलेल्या जेम्स अंडरसनच्या शरीरावर नेम धरायला लागला; तेव्हा असं वाटल की तो बुमराह नाहीये. तुम्ही सहसा त्याच्याकडून अंडरसनला लवकर बाद करण्यासाठी वेगात गोलंदाजी किंवा यष्टीवर फुल चेंडूच्या माऱ्याची अपेक्षा करता. जसे की त्याने याआधी केले आहे.”
मात्र लॉर्ड्स कसोटी सामन्यात जेव्हा अंडरसन फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा बुमराहने त्याला सलग वेगात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने अंडरसनला बाउंसर चेंडूही टाकत घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान बुमराहचा एक चेंडू त्याच्या हेल्मेटवर जाऊन लागला. या दोघांमधील या प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता, ज्यात अंडरसन बुमराहच्या कृतीनंतर त्याला रागात काहीतरी बोलताना दिसत होता.
मांजरेकरांनी याबाबत पुढे बोलताना म्हटले की, “मला तर वाटते की, विराट कोहलीची योजना बुमराहद्वारे अंमलात आणली गेली. मला मान्य आहे प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वात मुख्य खेळाडूच्या विरोधात गेले पाहिजे. त्याला थोडे आश्चर्यचकित केले पाहिजे, त्याला थोडे जळवले पाहिजे आणि शक्य झाले तर अशापद्धतीने त्याला दुखापती केले जावे की, इंग्लंडच्या संघाचे मुख्य हत्यारच निकामी होईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीचा वचपा काढण्यासाठी जो रूटची तयारी, ‘या’ नव्या रणनितीसह उतरणार मैदानात!
हे पाहा…! मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती, मांडला व्हॉलीबॉलचा डाव
राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण