माजी क्रिकेटपटू आणि कमेंटेटर संजय मांजरेकर यांनी कसोटी क्रिकेटमधील भारताच्या खराब कामगिरीसाठी खेळाडूंच्या हिरो कल्चरला (मोठ्या खेळाडूंना जास्त महत्त्व देणं) जबाबदार धरलं आहे. माजरेकर यांच्या मते, भारतीय संघाची ही घसरण काही नवीन नाही. त्यांनी सांगितलं की, भारतीय संघाला 2011-12 मध्ये देखील अशाच प्रकारच्या घसरणीला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत 0-8 असा पराभव पत्कारावा लागला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 12 वर्षानंतर घरच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. याशिवाय भारतानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 1-3 ने गमावली.
मांजरेकर यांनी संघाच्या वरिष्ठ खेळाडूंवर टीका केली. ते म्हणाले की, मोठे खेळाडू भारतीय संघाला मागे खेचत आहेत आहेत. ‘हिंदुस्तान टाईम्स’मध्ये लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये मांजरेकर म्हणाले, “यामागे सर्वात मोठं कारण आहे भारतीय संघातील सध्याचं हिरो कल्चर. 2011-12 असो किंवा आता, मोठे खेळाडू आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जे करत आले आहेत, त्याच्या विपरित करताना दिसतात. त्यांच्या खराब कामगिरीमुळे संघ खाली घसरतो.”
मांजरेकर यांनी पुढे लिहिलं की, “जेव्हा भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-8 ने पराभूत झाला (2011-12), तेव्हा तेंडुलकरची सरासरी 35, सेहवागची सरासरी 19.91 आणि लक्ष्मणची सरासरी 21.06 होती. त्यावेळी केवळ द्रविडनं इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली होती (76.83 सरासरी), मात्र त्यालाही ऑस्ट्रेलियात संघर्ष करावा लागला होता (सरासरी 24.25).
संजय मांजरकर यांनी भारतीय क्रिकेटमधील या कल्चरसाठी निवडकर्त्यांनाही जबाबदार धरलं आहे. त्यांच्या मते, अशा खेळाडूंची निवड होणे, हे एक समस्या आहे.
हेही वाचा –
अश्विनच्या निवृत्तीपासून ते विराट-रोहितच्या भविष्यापर्यंत, बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुबमन गिलची जागा धोक्यात, हा खेळाडू करू शकतो टीम इंडियात धडाकेबाज एंट्री
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे खेळणार नाही