भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरला आॅस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू अॅलीसा हेलीने चांगलेच लक्ष केले आहे. संजय मांजरेकरने केलेल्या एका ट्विटला तिने जोरदार प्रतित्तोर दिले आहे.
२०१७ला महिला विश्वचषकादरम्यानचा एक किस्सा सांगताना मांजरेकरने आॅस्ट्रेलियन खेळाडू कशे चुकीचे वागतात हे सांगितले. त्यासाठी त्याने ट्विटमध्ये एक मोठी नोटचं प्रसिद्ध केली.
“ती घटना मी कधीही विसरु शकत नाही. हरमनप्रीत कौरने जेव्हा उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध १७१ धावांची खेळी केली तेव्हा कोणताही आॅस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू तिच्याशी हस्तोलंदन करण्यासाठी थांबली नाही. शिवाय सर्व खेळाडूंनी हरमनप्रीत कौर आधी मैदान सोडले होते. महिला क्रिकेटमधील एका जबरदस्त कामगिरीचे त्यांनी साधे कौतूकही केले नाही. हा सामना पुढे आॅस्ट्रेलिया पराभूत झाली. परंतू आॅस्ट्रेलिया क्रिकेटपटू कधीही मनाचा मोठेपणा दाखवत नाहीत. असे केले तर त्यांना ते कमजोर आहेत असे वाटते. ” असे मांजरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Needed to get this thought out. pic.twitter.com/0Pi1Uq9fYe
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 28, 2018
यावर अॅलीसा हेली या आॅस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने मांजरेकर यांना ट्विटरवरच उत्तर दिले आहे. ” अतिशय चूकीच्या वेळी केलेली आणि अयोग्य असे हे ट्विट आहे. तुम्ही आमच्या क्रिकेटचा दर्जा का घसरवत आहात?ट्विट करण्यापेक्षा हे प्रत्यक्ष भेटून सांगितले असते तर जास्त बरे झाले असते. “असे तीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
This makes me really mad. Completely unfair and very poorly timed. Why are you trying to drag our game down as well? Happy to discuss this with you in person instead of you just throwing these comments out there.
— Alyssa Healy (@ahealy77) March 28, 2018
अॅलीसा हेली ही वेगवान गोलंदाज मीचेल स्टार्कची पत्नी असून महान माजी क्रिकेटपटू इयान हेली यांची पुतणी आहे.