---Advertisement---

सूर्या नाही ‘हा’ खेळाडू होता विजयाचा खरा हिरो; भारतीय दिग्गजाने घेतले हैराण करणारे नाव

On: गुरूवार, ऑगस्ट 10, 2023 9:35 AM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

पहिल्या दोन्ही टी20 सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले.  गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सोपा विजय मिळवला. या सामन्यात भारताने 160 धावांचे आव्हान 17.5 षटकात पार करत सामना खिशात घातला. या सामन्यात 83 धावांची झंझावाती खेळी साकारणाऱ्या सूर्यकुमार यादव याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, अशातच आता माजी दिग्गज खेळाडूने सूर्याच्या जागी संघातील दुसऱ्या खेळाडूला तिसऱ्या टी20चा मॅचविनर म्हटले आहे.

कोण होता तिसऱ्या टी20चा खरा मॅचविनर?
भारतीय संघाने तिसरा टी20 सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या महत्त्वाच्या भूमिकेवर जोर दिला. कुलदीपने सामन्याच्या पहिल्या डावात 4 षटके गोलंदाजी करताना 28 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सलामीवीर ब्रेंडन किंग, जॉनसन चार्ल्स आणि विस्फोटक निकोलस पूरन यांना बाद केले होते. त्यामुळे वेस्ट इंडिज संघावर जास्त दबाव पडला आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान संघाचा डाव 5 बाद 159 धावांवर संपुष्टात आला.

मांजरेकरांचे ट्वीट
या सामन्यानंतर मांजरेकरांनी ट्वीट करत लिहिले की, “सूर्या पुन्हा एकदा शानदार होता, पण माझ्यासाठी खरा मॅचविनर कुलदीप होता. त्याने पूरनव्यतिरिक्त वरच्या फळीतील 3 विकेट्स घेऊन वेस्ट इंडिजला 159 धावांवर रोखले. शाब्बास कुलदीप.”

https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1689115657483526145?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1689115657483526145%7Ctwgr%5E50092c14a6c78e30077470710829968b815ca845%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Fkuldeep-yadav-was-the-real-match-winner-in-3rd-t20i-said-sanjay-manjrekar-ind-vs-wi-series-2023-08-09-980066

सूर्याची बॅट तळपली
यजमानांनी दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 17.5 षटकातच 164 धावा चोपल्या आणि 7 विकेट्सने सामना जिंकला. यावेळी भारतीय सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. शुबमन गिल 6, तर यशस्वी जयसवाल 1 धाव करून तंबूत परतले. मात्र, सूर्यकुमारने टिच्चून फलंदाजी केली. त्याने विरोधी गोलंदाजांना चोत 83 धावांची शानदार खेळी साकारली. यामध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांचाही समावेश होता. 13व्या षटकात जेव्हा तो बाद झाला, तेव्हा भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. त्यानंतर उदयोन्मुख तिलक वर्मा यानेही नाबाद 49 धावा चोपत संघाला सहजरीत्या आव्हानापर्यंत पोहोचवले. (sanjay manjrekar on ind vs wi 3rd t20 match winner said this was the real match winner)

महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणवीर तिलकपासून ते कुलदीपपर्यंत, ‘या’ भारतीय खेळाडूंना ICC Rankingमध्ये मोठा फायदा; वाचाच
भारत-पाकिस्तानसह विश्वचषक 2023 सामन्यांची तिकीटे कधी आणि कशी बुक करायची? ही बातमी वाचाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---