ऑस्ट्रेलियाच्या अडीच महिन्यांच्या दौऱ्यासाठी बीसीसीआयने ३२ जणांच्या जंबो पथकाची निवड केली आहे. मात्र या निवडीवरुन वादंग निर्माण झाले आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजावर निशाणा साधला आहे. टी-२० संघात जडेजा ऐवजी अक्षर पटेलचा पर्याय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जडेजाला भारतीय कसोटी, वनडे आणि टी-० या तिन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. तर याउलट गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल एकाही संघाचा भाग नाही.
अक्षर पटेल चांगला पर्याय ठरेल
याविषयी एका वापरकर्त्याने ट्विट केले होते की, ‘रविंद्र जडेजा भारतीय टी-२० संघात फिट बसत नाही. त्याच्याजागी अक्षर पटेल चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.’ मांजरेकरांनी या वापरकर्त्याच्या ट्विटला प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘मी तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.’
रविंद्र जडेजाची आकडेवारी
जडेजाच्या प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले, तर २०१७ साली खराब फॉर्ममुळे त्याला भारतीय टी-२० संघातून बाहेर करण्यात आले होते. पुढे २०१९-२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यातून त्याने टी-२० क्रिकेट संघात दमदार पुनरागमन केले होते. त्याच्या प्रदर्शनाला पाहून स्वत: मांजरेकरांनीही त्याची प्रशंसा केली होती.
तसेच आयपीएलच्या १३व्या हंगामात जडेजाने चेन्नई सुपर किंग्सकडून चांगले प्रदर्शन केले आहे. आतापर्यंत त्याने हंगामातील १४ सामने खेळले असून २३२ धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना ६ विकेट्सही घेतल्या आहेत.
completely agree. https://t.co/osH78wATdm
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) October 27, 2020
अक्षर पटेलची आकडेवारी
दूसऱ्या बाजूला अक्षर पटेलला २०१८पासून भारतीय टी-२० संघात संधी मिळालेली नाही. त्याने आतापर्यंत केवळ ११ टी-२० सामने खेळले आहेत. त्यातही केवळ ६८ धावा आणि ९ विकेट्सची कामगिरी केली आहे. आयपीएल २०२०मधील त्याची आकडेवारीही जास्त खास नाही. त्याने या हंगामात ११ सामन्यात केवळ ६६ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुरंदरच्या ‘या’ पठ्ठ्याने चेन्नईची लाज राखली; सलग तीनही सामन्यात ठोकली अर्धशतके
‘तेरे गाल मोठे, या मेरे’ युवीचा रोहित आणि पंतला टोमणा; ट्विट व्हायरल
बापरे! वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या गोलंदाजाने घेतली चाळीशी पार करणाऱ्या फलंदाजाची विकेट
ट्रेंडिंग लेख-
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स