मुंबई । भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) एक पत्र लिहिले आहे. त्यांनी स्वत: ला आयपीएलच्या समालोचन पॅनेलमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. यावर्षी मार्चमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी त्यांना समालोचन पॅनेलमधून वगळण्यात आले होते. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे ही मालिका पूर्ण झाली नाही.
माध्यमांतील वृत्तानुसार,19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्या आयपीएलसाठी पुन्हा समालोचन पॅनेलमध्ये त्यांचा समावेश करावा अशी मांजरेकरांची इच्छा आहे. बीसीसीआयला पाठवलेल्या मेल मध्ये त्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करू असे आश्वासन दिले आहे. याबाबत मांजरेकरांनी बीसीसीआयला हा दुसरा मेल पाठविला आहे.
मांजरेकरांनी लिहिले की, “आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता बीसीसीआय टीव्ही लवकरच त्याचे समालोचन पॅनेल निवडेल. बोर्डाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्यात मला आनंद होईल.”
माध्यमांतील वृत्तानुसार, मांजरेकरांनी मागील वर्षी विश्वचषक स्पर्धेदरम्यान रवींद्र जडेजावर टिका केली होती. याबाबत संघातील काही खेळाडूंनी बोर्डाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मांजरेकरांना समालोचन पॅनेलमधून काढून टाकले गेले.
बोर्डाच्या एका अधिकार्याने सांगितले की, “हे प्रकरण मिटविण्यात आले आहे आणि मांजरेकरांना माफ केले आहे. त्यांनी जडेजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. मांजरेकर यांनी आश्वासन दिले आहे की, ते टीव्ही समालोचनासाठी तयार केलेल्या नियमांचे पालन करतील. ते एक चांगले समालोचक आहेत आणि त्यांना क्रिकेटची चांगली समज आहे.”
यासंदर्भातील अंतिम निर्णय बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह घेतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-विश्वविजेत्या दिग्गजाची पत्नी स्वत:ला म्हणवते ‘विधवा’
-कपिल देव म्हणताय, जगातील या ३ दिग्गजांपेक्षाही मी भारी
-पीसीबीची माजी क्रिकेटर्सला खास ऑफर, पुन्हा करु शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी
ट्रेंडिंग लेख-
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी