---Advertisement---

“रोहितला हलक्यात घेऊ नका”, WTC फायनलआधी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

On: शुक्रवार, जून 2, 2023 12:42 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत खेळली जाईल. या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर सर्वांची नजर असेल. आयपीएलमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्या फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. आता याच मुद्द्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

नुकत्याच संपलेल्या आयपीएल हंगामात रोहित शर्मा याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नव्हती. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना त्याने 16 सामन्यांमध्ये 20 पेक्षा काहीशा जास्त सरासरीने 332 धावा बनवल्या होत्या. त्याच्या याच फॉर्मबाबत बोलताना मांजरेकर म्हणाले,

“रोहित शर्माचा आयपीएल फॉर्म बाजूला ठेवा. कारण तो मागील वर्षीही आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने कशी फलंदाजी केली ते आपण पाहिले. माझ्या मते, रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीच्या ज्या टप्प्यावर आहे, तिथे त्याच्यासाठी कसोटी क्रिकेट खूप रोमांचक असले पाहिजे‌. विराट कोहलीसोबत ही गोष्ट प्रत्येक वेळी घडत असते. यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या फलंदाजीत कोणतीही कमतरता जाणवत नाही.

 

दोन वर्षाच्या प्रदीर्घ सायकलनंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेला भारत व द्वितीय क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया हे या निर्णायक लढतीत समोरासमोर येणार आहेत. यापूर्वी झालेल्या पहिल्या सायकलमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागलेले. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजेतेपदाची अपेक्षा बाळगून आहे. तर दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळताना मानाची गदा उंचावू इच्छिते.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

(Sanjay Manjrekar Said Don’t Take Rohit Sharma Lightly In WTC Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
मुंबई भारी की चेन्नई? भर रस्त्यात भिडले ब्राव्हो-पोलार्ड, असा लागला निकाल 
आनंदाची बातमी: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर धोनीला डिस्चार्ज, ‘इतक्या’ दिवसांत पुन्हा धावू लागणार 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---