इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सन अपयशी ठरताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सला बुधवारी (१३ एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. हा मुंबई इंडियन्सचा आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सलग पाचवा पराभव होता. त्यामुळे सध्या संघावर टीका होताना दिसत आहे. आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितने (Rohit Sharma) आत्तापर्यंत आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात ५ सामन्यांत १०८ धावाच करता आल्या आहेत. त्याला अद्याप एकदाही अर्धशतक करता आलेले नाही. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी याबद्दल संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी आपली भूमीका मांडताना सांगितले की, रोहितने कर्णधारपद सोडून मोकळेपणाने खेळावे.
इएसपीएन क्रिकेटइंफोशी बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, ‘कायरन पोलार्ड अजून संघात योगदान देऊ शकतो. मला असे वाटत होते की, रोहित देखील विराट कोहलीप्रमाणेच कर्णधारपद सोडून थोडा रिलॅक्स होईल आणि केवळ फलंदाज म्हणून खेळेल. कायरन पोलार्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला कर्णधार आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्याच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याला देऊ शकत होता.’
रोहितने २०१३ पासून मुंबई इंडियन्सचे नियमित कर्णधारपद सांभाळले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपदही मिळवले आहे. तसेच विराटने आयपीएल २०२१ नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व सोडले होते.
मांजरेकर पुढे असेही म्हणाले की, ‘लिलावापासूनच मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. मला वाटते की मुंबई प्लेऑफपर्यंत पोहचणार नाही. मी याची भविष्यवाणी खूप आधीच केली होती.’ तसेच ते पुढे म्हणाले की, रोहित भारतीय संघाकडून खेळतो, तेव्हा तो चांगली फलंदाजी करतो. पण तो आयपीएलमध्ये एक प्रमुख भूमिका निभावण्याच्या नादात दबावात येतो. गेल्या ३-४ हंगामापासून असेच दिसत आहे.
मांजरेकर यांनी सूर्यकुमार यादवचेही यावेळी कौतुक केले. तसेच ते असेही म्हणाले की, यंदा मुंबई इंडियन्सची गोलंदाजी कमजोर दिसत आहे. जसप्रीत बुमराहशिवाय अन्य कोणताही विश्वासातील गोलंदाज नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! दीपक चाहर आयपीएलसह टी२० वर्ल्डकपलाही मुकण्याची शक्यता, तब्येतीबाबत महत्वाची अपडेट
पंजाबी.. हो शेर पंजाबी! मुंबईला पराभूत केल्यानंतर पंजाबच्या आनंदापुढे आभाळही पडलं छोटं- Video
आयपीएलमध्ये दुमदुमतोय फक्त ‘बेबी एबी’चा आवाज; तब्बल ११२ मीटर लांबीचा षटकार मारत बनवला थेट रेकॉर्ड