---Advertisement---

टी२० कारकीर्द वाचवण्यासाठी भारतीय दिग्गजाचा कृणालला ‘गुरुमंत्र’

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 2:48 PM
---Advertisement---

भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी मुंबई इडियन्सचा महत्वाचा अष्टपैलू कृणाल पंड्याविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यानी कृणालाला टी२० क्रिकेटमध्ये जास्त काळापर्यंत खेळण्यासाठी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. कृणालचे आयपीएल २०२१ मधील आतापर्यंतचे प्रदर्शन पाहिले, तर ते निराशाजनक आहे. त्याने खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये १४.८५ च्या सरासरीने अवघ्या १०४ धावा केल्या आहेत.

मांजरेकरांचा कृणालला महत्वाचा सल्ला

संजय मांजरेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी कृणालला सल्ला दिला आहे. ते म्हणाले,

“माझ्या हिशोबाने मुंबई इंडियन्सने हे पाहिले पाहिजे की, कृणाल संघासाठी महत्वाचे योगदान देत आहे की नाही! मागच्या सामन्यात जेव्हा वरच्या फळीतील फलंदाज बाद झाले होते, तेव्हा कृणालचे क्रीजवर टिकून खेळणे खूप गरजेचे होते. ज्याप्रकारचे प्रदर्शन ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी केले होते, त्याच प्रकारचे प्रदर्शन त्याने मुंबई इंडियन्ससाठी करायला पाहिजे होते.  मला वाटते की, जर कृणाल त्याची टी२० कारकीर्द मोठी करू इच्छित असेल, तर त्याला गोलंदाजाऐवजी फलंदाजी अष्टपैलू बनावे लागेल.” असे मांजरेकरांनी म्हटले आहे.

 

मुंबईचे सलग दोन पराभव

मुंबईने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात दोन सामने खेळले आहेत आणि हे दोन्ही सामने संघाने गमावले आहेत. या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे. दुसऱ्या टप्प्याची सुरुवात मुंबईसाठी खराब ठरली आहे, त्यांनी त्यांचा पहिला  सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दुसरा सामना केकेआरविरुद्ध गमावला आहे. तरी अजूनही मुंबईच्या चाहत्यांना आशा आहे की संघ पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल. दुखापतग्रस्त अष्टपैलू हार्दिक पंड्या लवकरात लवकर संघाशी जोडला जावा, अशी सदिच्छा चहा ते व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---