चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण भारतीय खेळाडू बऱ्याच काळापासून एकदिवसीय क्रिकेटपासून दूर आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. भारतीय संघाने जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून संघ फक्त कसोटी आणि टी20 सामने खेळत आहे. या मालिकेसाठी काही दिवसांत भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्याआधी माजी क्रिकेटपटू त्यांचे आवडते संघ निवडत आहेत. यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी आगामी इंग्लंड मालिकेसाठी त्यांचा संघ निवडला आहे.
संजय मांजरेकरांनी या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला. ज्यामध्ये त्यांनी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला त्यांच्या 15 सदस्यीय संघातून वगळले आहे. त्यांनी केएल राहुलला सलामीवीर विकेटकीपर म्हणून निवडले आहे तर संजू सॅमसनला बॅक-अप म्हणून समाविष्ट केले आहे. तसेच पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूसाठी ध्रुव जुरेलचे नाव संभाव्य खेळाडू म्हणून ठेवले आहे.
संजय मांजरेकरांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले “आपण ध्रुव जुरेलला निवडू शकत नाही का? कारण तो एक चांगला कसोटी खेळाडू आहे. जर टॉप ऑर्डर कोसळली तर आपल्याला अशा खेळाडूची गरज आहे जो पाचव्या क्रमांकावर येऊन डाव सांभाळू शकेल. मी फक्त ऑप्शन म्हणून त्याची निवड करत आहे. पण राहुल ही पहिली पसंती असेल. मला संजू सॅमसनवर विश्वास आहे. हो, सुरुवातीला तो धावा काढत नव्हता आणि कदाचित तो खालच्या फळीत फिट झाला नसता. पण जर भारताला शेवटच्या १० षटकांसाठी एका मोठ्या फलंदाजाची गरज असेल तर तो खेळू शकतो.
तो पुढे म्हणाला, “मी सरफराज खानचेही नाव घेईन. तो अजिंक्य आहे. तो एक आदर्श एकदिवसीय फलंदाज आहे. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर असेल. मला सूर्यकुमार यादवपासून दूर राहायचे आहे आणि त्याला फक्त टी20 सामन्यांमध्येच स्पेशालिस्ट म्हणून ठेवायचे आहे.
इंग्लंड वनडे मालिकेसाठी संजय मांजरेकरचा भारतीय संघ: रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू: संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, सरफराज खान
हेही वाचा-
‘हे खरं असू शकतं किंवा…’, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युझवेंद्र चहलची खळबळजनक पोस्ट व्हायरल
नितीश कुमार रेड्डीचं भारतात जल्लोषात स्वागत, ढोल-ताशांच्या आवाजानं दुमदुमलं विमानतळ; VIDEO पाहा
केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही! बीसीसीआयने का घेतला मोठा निर्णय?