---Advertisement---

‘या फॉर्मेटसाठी तो लायक नाही…,’ 12 वर्षांपूर्वी माजी दिग्गजाने विराटबद्दल केलं होतं ट्वीट, आता मात्र वेगळंच काही बोलतोय

On: मंगळवार, जानेवारी 9, 2024 9:46 AM
Virat-Kohli
---Advertisement---

विराट कोहली एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटसाठी चमकदार कामगिरी करत आहे. काही वर्षांपूर्वी तो खराब फॉर्मशी झुंजत असताना त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहली दमदार फॉर्म दाखवत आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान, विराट कोहलीने सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडून त्याचे 50 वे एकदिवसीय शतक झळकावले.

तिन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त खेळत आहे. भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणतात की, देवाचे आभार मानतो की, भारताकडे विराट कोहली आहे. पण दरम्यान, विराट कोहलीबद्दल संजय मांजरेकर यांचे एक जुने विधान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कोहलीबद्दल नकारात्मक बोलत आहेत. (sanjay manjrekars contrasting statements on virat kohli comes to limelight after 12 years)

2012 मध्ये संजय मांजरेकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, भारतीय संघाने विराट कोहलीला कसोटी सामना खेळण्याची संधी द्यावी. जेणेकरून त्याला कळेल की, तो या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी योग्य नाही. पण आज 12 वर्षांनंतर संजय मांजरेकर विराट कोहलीसाठी देवाचे आभार मानताना दिसत आहेत.

12 वर्षांपूर्वी संजय मांजरेकर यांनी त्यांच्या ट्विट करत लिहिले होते की, “विराट कोहलीला आणखी एक कसोटी खेळू द्या. फक्त तो त्यासाठी इथे नाही याची खात्री करण्यासाठी.”

दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतीय संघ 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दीर्घ काळानंतर टी20 फॉरमॅट खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. टी20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीनंतर दोघांनी हा प्रकार खेळला नव्हता. आता रोहित शर्मा (Virat Kohli) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (He is not fit for this format the former legend had tweeted about Virat 12 years ago but now he is saying something different)

हेही वाचा

ब्रायन लाराच्या 400 धावांचा विक्रम मोडणार! मायकल क्लार्कने सांगितले ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे नाव
अवघ्या 44 धावा करताच रोहित घडवणार इतिहास! षटकाराच्या बाबतीतही भारतीय कर्णधार टॉपवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---