पुणे । आठव्या महिंद्रा अॅडव्हेंचर मॉन्सुन चॅलेंज रॅलीसाठी गतविजेता संजय टकले जेतेपद राखमण्याच्या निर्धाराने सहभागी झाला आहे. टीएसडी स्वरुपाची ही रॅली शनिवारी-रविवारी होत आहे.
मंगळुरला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता रॅलीचे समारंभपूर्वक उद्घाटन झाले. शनिवारी मंगळुर ते मुर्डेश्वर आणि रविवारी मुर्डेश्वर ते दक्षिण गोवा असा रॅलीचा मार्ग आहे. टीएसटी (टाईम-स्पीड-डिस्टन्स) स्वरुपाची ही रॅली आहे. संजय महिंद्रा एसयुव्ही चालवेल. इरोडचा महंमद मुस्तफा त्याचा नॅव्हीगेटर असेल.
संजयने सांगितले की, टीएसडी रॅलीत संयम आणि सातत्याला महत्त्व असते. त्यात एकाग्रता कमालीची लागते, कारण तुम्हाला टाईम कंट्रोल माहित नसतात. स्टेजच्या आधी पाच मिनिटे ट्युलिप दिले जाते. ते घेऊन कार सुरु करावी लागते. मुस्तफाबरोबर माझा समन्वय फार चांगला आहे. तो अत्यंत मेहनती आहे.
संजय-मुस्तफा खुल्या व्यावसायिक गटात भाग घेतील. यात 28 स्पर्धक जोड्या सहभागी झाल्या आहेत. संजयसाठी मॉन्सुन चॅलेंज रॅली महत्त्वाची ठरली आहे. हिमालयन रॅली, डेझर्ट स्टॉर्म अशा विविध रॅली जिंकल्यानंतर त्याला केवळ मॉन्सुन चॅलेंज जेतेपदाने हुलकावणी दिली होती.
संजयला 2012 मध्ये दुसरा, तर 2016 मध्ये पाचवा क्रमांक मिळाला होता. गेल्या वर्षी त्याने ही प्रतिक्षा संपुष्टात आणली. तेव्हा तो केवळ दहा सेकंदांच्या पेनल्टीसह खुल्या गटासह सर्वसाधारण क्रमवारीतही पहिला आला होता.
या रॅलीचा मार्ग रमणीय अशा पश्चिम घाट परिसरातून जातो. सध्या या परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे स्पर्धकांसमोर खडतर आव्हान असेल. पावसाचा लपंडाव सुरु असल्यावर काही वेळा जेमतेम शंभर मीटर पुढचा रस्ता दिसतो.टीएसडी रॅलीत ठराविक वेग राखणे अनिवार्य असते. त्यामुळे तुम्हाला निसर्गाचा आनंद लुटता येतो.
संजयने यंदा जागतिक रॅली मालिकेच्या (डब्ल्यूआरसी) तयारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचे वेळापत्रक भरगच्च आहे. त्याने सरावासाठी तसेच मायदेशातील रॅलीत मित्रमंडळी भेटत असल्यामुळे मॉन्सुन चॅलेंजची निवड केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे रौप्यपदक; पेनल्टी शुटआऊटमध्ये आॅस्ट्रेलियाने मारली…
-फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य…
–महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गरज आहे ती फक्त एका संधीची..