---Advertisement---

विदर्भाच्या गोलंदाजाचा इंग्लंडमध्ये डंका, एकाच सामन्यात घेतले १० बळी

On: सोमवार, जुलै 2, 2018 6:21 PM
---Advertisement---

विदर्भाचा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघने इंग्लंडमध्ये रविवार, 1 जुलैला झालेल्या लीग सामन्यात विरोधी संघाचे दहा फलंदाज बाद करण्याचा भीमपराक्रम केला आहे.

नॉर्थ यॉर्कशायर आणि साउथ डॅरहम क्रिकेट लीगमध्ये श्रीकांत वाघ स्टोक्सले क्रिकेट क्लबकडून खेळतो.

रविवार, 1 जुलैला स्टोक्सले क्रिकेट क्लब विरुद्ध मिडिलब्रो क्रिकेट क्लब विरुद्धच्या सामन्यात मिडिलब्रो क्रिकेट क्लबचे  श्रीकांत वाघने 11.4 षटकात 39 धावा देत 10 बळी घेतले.

तसेच फलंदाजीत श्रीकांत वाघने 28 चेंडूत 41 धावांची खेळी करत अष्टपैलू कामगिरी केली.

स्टोक्सले क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 232 धावा केल्या होत्या.

233 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या  मिडिलब्रो क्रिकेट क्लबच्या फलंदाजांचे एकट्या श्रीकांत वाघने कंबरडे मोडले.

श्रीकांत वाघच्या या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्टोक्सले क्रिकेट क्लबने मिडिलब्रो क्रिकेट क्लबवर 135 धावांनी विजय मिळवला.

श्रीकांत वाघ भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. त्याने 63 प्रथम श्रेणी सामन्यात 161 बळी आणि 1589 धावा केल्या आहेत.

तसेच श्रीकांत वाघने 2010 आणि 2011 च्या आयपीएल मोसमात पुणे वॉरिअर्स इंडियाकडून खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

– क्रिकेटला मिळाला पहिला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार खेळाडू

-आप की अदालत फेम रजत शर्मांची क्रिकेटमध्ये नविन इनिंग सुरु

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment