तमिळनाडू प्रीमियर लीग २०२२मध्ये २७ वर्षीय संजय यादव याने सातत्याने मोठ्या खेळी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. नेल्लई रॉयल किंग्ज संघासाठी ताबडतोब धावा बनवत तो चर्चेत आला आहे. शुक्रवारी (१५ जुलै) रुबी त्रिची वॉरियर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याच्या बॅटमधून मोठी खेळी निघाली. त्याच्या सातत्यपूर्ण दमदार प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघात जागा मिळवण्याचा मजबूत दावेदार म्हटले जाऊ लागले आहे.
रुबी त्रिची वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात संजयने (Sanjay Yadav) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद शतकी खेळी केली आहे. ५५ चेंडूंचा सामना करताना संजयने १०३ धावांची अभेद्य खेळी केली आहे. या खेळीदरम्यान त्याने ९ षटकार आणि ६ चौकारही मारले आहेत. तसेच त्याने बाबा अपारिजतसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारीही रचली आहे.
संजयच्या बॅटमधून निघालेली ही पहिलीच मोठी खेळी नसून तमिळनाडू प्रीमियर लीगमधील (Tamil Nadu Premiere League) मागील काही सामन्यांमध्येही त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने मागील काही सामन्यांमध्ये नाबाद ८७ (४७ चेंडू), शून्य (०१ चेंडू), नाबाद ५५ (१९ चेंडू), नाबाद ७० (४२ चेंडू), नाबाद १०३ (५५ चेंडू) अशा प्रशंसनीय खेळी केल्या आहेत. विशेष म्हणजे, फक्त फलंदाजीत नव्हे तर गोलंदाजीतही संजय योगदान देतो आहे.
थोडक्यात, संजय नेल्लई रॉयल किंग्जसाठी (Nellai Super Kings) ती भूमिका पार आहे, जी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी पार पाडत होता. त्यामुळे आता आयपीएलमध्ये असो अथवा भारतीय संघात असो, सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) टक्कर देणारा खेळाडू आला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आयपीएलचा राहिलाय भाग
दरम्यान संजय यादव हे नाव आयपीएलप्रेमींना फारसे परिचित नसेल. परंतु तो आयपीएलचा भाग राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. मात्र त्याला फक्त मुंबई संघाकडून आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली. मुंबईने २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी दिली होती. परंतु या सामन्यात ना तो धावा करू शकला, ना विकेट घेऊ शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये मोडीत निघणार ‘हे’ १० विक्रम, वाचा भारत कोणत्या बाबतीत आहे आघाडीवर
माजी दिग्गजाने हेरली विराटमधील कमतरता! म्हणाला, ‘शैलीमध्ये काहीच कमी नाही, पण…’
याला काय अर्थय! भारतीय खेळाडूंना साधे कॅचही पकडता येत नाहीत, ६ सामन्यात सोडलेत ‘एवढे’ झेल