भारतीय संघ लवकरच बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटीत संजू सॅमसनकडे (Sanju Samson) पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले. संजू सॅमसनला क्रिकेटमध्ये अनेकदा दुर्लक्षित केले जात असले तरी, आता त्याने आयपीएल 2025 पूर्वी एक संघ खरेदी केला आहे. ज्याची घोषणा त्याने स्वतः केली आहे.
भारतीय संघात नसला तरी, संजू सॅमसन आता दुलिप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. यासोबतच तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार म्हणून खेळतो. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संजू सॅमसनकडे दुर्लक्ष केल्यावर चाहते बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर चांगलेच संतापले होते.
सॅमसन हा केरळचा रहिवासी आहे. सुपर लीग केरळ नावाची नवीन फुटबॉल लीग त्यांच्या राज्यात सुरू झाली आहे. त्याने या लीगच्या मल्लापुरम फुटबॉल क्लबमध्ये हिस्सा खरेदी केला आहे. यासह तो आता त्याचा सह-मालक झाला आहे. मल्लापुरम एफसीने सोमवारी 9 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर आपली अधिकृत माहिती दिली.
केरळ फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या सुपर लीग केरळच्या उद्घाटन हंगामाला 7 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. मल्लापुरम एफसीने सलामीच्या सामन्यात फोर्का कोचीचा 2-0 असा पराभव केला. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहेत. यामध्ये मलप्पुरम एफसी, फोर्का कोची, कन्नूर वॉरियर्स, कालिकत एफसी, तिरुवनंतपुरम कॉम्बन्स आणि थ्रिसूर मॅजिक यांचा समावेश आहे. ही लीग 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून केरळमधील चार वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळवले जातील.
SANJU SAMSON AS CO-OWNER…!!!
– Sanju becomes the Co-Owner of Malappuram Football Club in Super League Kerala. 💥 pic.twitter.com/eHyNx4knjp
— Johns. (@CricCrazyJohns) September 9, 2024
संजू सॅमसन हा जून महिन्यात संपन्न झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला स्थान मिळाले नव्हते. तसेच दुलिप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी देखील त्याची निवड केली गेली नव्हती.
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी, भारताविरुद्ध हा फलंदाज करणार सलामी बाॅर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघाची नवी चाल?
‘विनेश’च्या राजकारणातील प्रवेशामुळे महावीर फोगट दु:खी, म्हणाले ‘तिने सुवर्णपदक….’
श्रीलंकेच्या विजयाने WTC मध्ये भारताचा खेळ खराब? पाहा अपडेटेड पॉइंट टेबल