जून महिन्यात योयो टेस्ट फेल झाल्यामुळे भारतीय ‘अ’ संघातील स्थान गमावलेल्या संजू सॅमसनने पुन्हा याच संघात स्थान मिळवले आहे.
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या दोन अनाधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय अ संघ जाहीर केला.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय अ संघ, भारतीय ब संघ, दक्षिण आफ्रिका अ संघ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यात चौरंगी एकदिवसीय मालिका होणार आहे.
या चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ आणि ब संघाची घोषणा करण्यात आली आहे.
सॅमसनने ११ जून २०१८ रोजी भारतीय अ संघातील आपले स्थान गमावले होते. याची बरीच चर्चा झाली होती.
दोन्ही मालिकांसाठी भारतीय अ संघाचे नेतृत्व श्रेयश अय्यरकडे तर चौरंगी एकदिवसीय मालिकेतील भारतीय ब संघाचे नेतृत्व मनीष पांडेकडे सोपवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय अ संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आर समर्थ, मयांक आगरवाल, एआर इश्वरन, हणुमा विहारी, अंकित बावने, केएस भरत (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, एस नदिम, जयंत यादव, रजनिश गुरबानी, नवदीप सैनी, अंकित राजपूत, मोहम्मद सिराज.
चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय अ संघ-
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आर समर्थ, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, सिद्धेश लाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मयांक मार्कंडे, के गौतम, कृणाल पंड्या, दीपक चहर, मोहम्मद सिराज, शिवम मावी, खलील एहमद.
चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय ब संघ-
मनीष पांडे (कर्णधार), मयांक आगरवाल, एआर इश्वरन, शुभमन गिल, दिपक हुड्डा, रिकी भुई, विजय शंकर, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाल, जयंत यादव, डिए जडेजा, सिद्धार्थ कौल, प्रसिध कृष्णा, खुलवंत खजोरीया, नवदीप सैनी.
महत्त्वाच्या बातम्या:
–निराश मनोज तिवारीने निवड समितीला धरले धारेवर, ट्विटरवरुन जोरदार टीका करत केले ट्रोल
–भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघ जाहिर, वरीष्ठ संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना संधी
–माजी कर्णधार सौरव गांगुलीची आर अश्विनसाठी बॅटिंग