गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी (२४ मे) आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना झाला. हा सामना जिंकत उभय संघांकडे थेट अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी होती. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळणार होती. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यापूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सॅमसन (Sanju Samson) एका आयपीएल हंगामात सर्वाधिक सामन्यात नाणेफेक गमावणारा कर्णधार (Captain Lost Most Tosses In IPL Season) बनला आहे. त्याने या विक्रमात चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला मागे सोडले आहे.
पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी (Qualifier One) मैदानावर उतरण्यापूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली. नाणेफेकीचा निकाल गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्या बाजूने लागला. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. अशाप्रकारे सॅमसनने आयपीएल २०२२मध्ये नाणेफेक गमावण्याची ही १३वी वेळ होती. आजवर आयपीएलच्या १५ हंगामात कोणत्या कर्णधाराने इतक्यावेळा नाणेफेक गमावली नव्हती. त्यामुळे एका हंगामात सर्वाधिकवेळा नाणेफेक गमावण्याचा विक्रम सॅमसनच्या नावावर झाला आहे.
सॅमसन या नकोशा विक्रमात सीएसकेचा कर्णधार धोनीला वरचढ ठरला आहे. यापूर्वी एका हंगामात सर्वाधिक १२ वेळा नाणेफेक गमावत धोनीच्या नावापुढे हा नकोसा विक्रम होता. त्याने २०१२ मध्ये ही नकोशी कामगिरी केली होती. परंतु आता सॅमसनने धोनीचा हा विक्रम मोडला आहे. याखेरीज ११ वेळा नाणेफेक गमावत धोनी विराट कोहलीसह संयुक्तपणे या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने २००८ मध्ये तर कोहलीने २०१३ मध्ये हा नकोसा पराक्रम आपल्या नावावर केला होता.
दरम्यान पहिल्या क्वालिफायर सामन्यात सॅमसनने धुव्वादार फलंदाजी केली. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल वैयक्तिक ३ धावांवर बाद झाल्यानंतर सॅमसनने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने केवळ २६ चेंडूंमध्ये ४७ धावांची खेळी केली. १८०.७७च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ५ चौकारही मारले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२मध्येही आरसीबी खाणार गटांगळ्या? ‘या’ कारणामुळे चॅम्पियन बनणे होणार कठीण
‘या’ कर्णधारामुळे वाचली सेहवागची कसोटी कारकिर्द, खुद्द विरूनेच केला जुन्या किस्स्याचा उलगडा