झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात हरारे येथे गुरुवारी (१८ ऑगस्ट) पहिला वनडे सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांची पळता भुई थोडी झाली. भारतीय गोलंदाजांपुढे झिम्बाब्वेचे फलंदाज सपशेल फेल ठरले. त्यातही पावरप्लेमध्ये भारतीय संघात पुनरागमन करत असलेला दीपक चाहर अधिक प्रभावी ठरला. त्याच्याबरोबरच यष्टीरक्षक संजू सॅमसन यानेही सर्वांना प्रभावित केले. संजूचा या सामन्यादरम्यानचा यष्टीमागे एक झेल टिपतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला चाहरने (Deepak Chahar) पहिली विकेट मिळवून दिली. त्याने डावातील सातव्या षटकातील चौथा चेंडू आऊटसाइड ऑफला टाकला. या शॉर्ट चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या झिम्बाब्वेचा सलामीवीर इनोसेंट काइया (Innocent Kaia) याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, जो टॉप-एजवरून मागे यष्टीरक्षक संजूकडे (Saju Samson) गेला.
हा चेंडू संजूच्या उजव्या बाजूने आला. संजू सतर्कतेने चेंडू पकडण्यासाठी उजव्या अंगाला डाईव्ह मारली आणि दोन्ही हातांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पहिल्या प्रयत्नात चेंडू त्याच्या हातून निसटला. चेंडू हातून निसटल्यानंतर तो ग्लोव्ह्जमधून उडून पुढे गेला, ज्यावर संजूने पुन्हा पुढे जात झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही ठरला. अशाप्रकारे २ प्रयत्नात संजूने हा (Sanju Samson Catch) झेल टिपला.
https://twitter.com/cric_roshmi/status/1560194453972914176?s=20&t=AqhzXIPxTm47EY6upDANkQ
आपल्या यष्टीरक्षण कौशल्याने नेहमीच सर्वांनाच प्रभावित करणाऱ्या संजूला अशाप्रकारे आगळावेगळा झेल घेताना पाहून चाहते खुश झाले आहेत. संजूच्या या अनोख्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजूने काइयाबरोबरच झिम्बाब्वेचा दुसरा सलामीवीर तडीवानाशे मरुमणी याचाही यष्टीमागे झेल घेतला. विशेष म्हणजे त्याने हा झेलसुद्धा दीकप चाहरच्या गोलंदाजीवरच घेतला.
Out!#INDvsZIM @IamSanjuSamson @deepak_chahar9 @BCCI pic.twitter.com/Mp1dRmCiG0
— Nikhil Kalal (@nikhilkalal23) August 18, 2022
दुसरीकडे चाहरनेही त्याचा पुनरागमनाचा सामना गाजवला. त्याने या सामन्यात झिम्बाब्वेचे दोन्ही सलामीवीर इनोसेंट काइया (०४ धावा), तडीवानाशे मरुमणी (०८ धावा) यांना बाद केले. तसेच त्याने वेस्ले माधवेरे (०५ धावा) यालाही पायचीत केले. अशाप्रकारे ७ षटके फेकताना २७ धावा देत त्याने या ३ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श
सामना पाहण्यास येणार का? केएल राहुलच्या प्रश्नावर युवा चाहता म्हणाला, ‘शाळा गेली…’
बुमराहची अनुपस्थिती झिम्बाब्वेसाठी फायद्याची; धाकड खेळाडू म्हणतोय, ‘आता आमच्यासाठी…’