आयपीएल 2024 चा 56वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स खेळला गेला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं फलंदाजी करताना एक मोठा इतिहास रचला आहे.
संजू सॅमसन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 200 षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्यानं या बाबतीत महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला. धोनीनं आयपीएलमध्ये 168 डावांत 200 षटकार ठोकले आहेत. संजूनं ही कामगिरी अवघ्या 159 डावांतच केली.
संजू सॅमसननं राजस्थानच्या डावाच्या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर इशांत शर्माला षटकार लगावला. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीतील 200 वा षटकार ठरला. त्याच्या आधी 4 भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. संजू सॅमसन आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू
रोहित शर्मा – 276
विराट कोहली – 258
एमएस धोनी – 248
सुरेश रैना – 203
संजू सॅमसन – 202*
आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार मारणारे भारतीय खेळाडू
संजू सॅमसन – 159 डाव
महेंद्रसिंह धोनी – 168 डाव
विराट कोहली – 180 डाव
रोहित शर्मा – 185 डाव
सुरेश रैना – 193 डाव
या सामन्यात 222 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं 2 गडी लवकर गमावले. मात्र यानंतर संजू सॅमसननं शानदार खेळी खेळत अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 25वं अर्धशतक आहे. संजूनं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले.
महत्त्वाच्या बातम्या –
डॅरेल मिशेलनं सरावादरम्यान फोडला चाहत्याचा फोन, मग अशी केली भरपाई; पाहा व्हायरल VIDEO