चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाला न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 22 सप्टेंबरपासून 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. 27 सप्टेंबर रोजी या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. या मालिकांसाठी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला भारत अ संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली गेल्यानंतर सॅमसनची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे.
सॅमसनने (Sanju Samson) भारतीय क्रिकेटमधील आपल्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या यष्टीरक्षक फलंदाजांचा पर्यायी खेळाडू म्हणून आपल्याबद्दल होत असलेल्या चर्चांवरही तो बोलला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत संजू म्हणतोय की, “मी खूप भाग्यवंत आहे की, 5 वर्षांनंतर मला भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. जगातील सर्वोत्कृष्ट संघात पुनरागमन करणे सोपे नसते. मी स्वत:ला खूपच नशीबवान समजतो. तसेच मी नेहमी सकारात्मक विचार करणारा व्यक्ती आहे.”
सॅमसनला आगामी टी20 विश्वचषक 2022 साठी 15 सदस्यीय संघात निवडण्यात आलेले नाही. तसेच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठीही दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावर सातत्याने चर्चा होत असते की, सॅमसन भारतीय संघात केएल राहुल किंवा रिषभ पंतला रिप्लेस करेल.
Sanju Samaon Is True Indian Team Supporter #SanjuSamson
He is Legend Sanju Baba 💪💪@IamSanjuSamson We Are Proud Of You Brother 👍👍#sanju #SanjuSamsonforT20WC #BCCI #Sanju pic.twitter.com/8SA6bwIb3E— Sanju Samson ERA (@SanjuSamson_Era) September 16, 2022
याबद्दल बोलताना सॅमसन म्हणाला की, “सोशल मीडियावर खूप काही चालू आहे. खूप काही म्हटले जात आहे की, सॅमसनला केएल राहुल आणि रिषभ पंतच्या जागी निवडले गेले पाहिजे. परंतु याबाबत माझे विचार एकदम स्पष्ट आहेत. राहुल आणि पंत दोघेही भारतीय संघासाठी खेळत आहेत. जर मी माझ्याच संघ सहकाऱ्यांसोबत प्रतिस्पर्धा करू लागलो, तर असे करत मी माझ्याच देशाचा अपमान करेल. याचसाठी मी नेहमी सकारात्मक विचार ठेवत असतो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासह ‘हे’ 4 संघ गाठू शकतात टी20 विश्वचषकाची सेमीफायनल, दिग्गजाला आहे विश्वास
रोहित शर्माच नाही तर ‘हा’ खेळाडूही खेळणार आठवा टी20 विश्वचषक, कॅप्टन आहे संघाचा
अंगावर काटा आणणारी घटना! इंग्लंडच्या क्रिकेटरचे कुटुंबीय सापडले व्हेलच्या तावडीत, मग..