दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे शनिवारी (१७ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या हंगामातील ३३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्सने विजय मिळवला. सामन्यादरम्यान बेंगलोरचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने पुन्हा एकदा राजस्थानच्या संजू सॅमसनची विकेट घेतली.
नाणेफेक निवडून प्रथम फलंदाजी निवडलेल्या राजस्थान संघाने मर्यादित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या. मात्र या सामन्यात सॅमसन जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ६ चेंडूत ९ धावा करत पव्हेलियनचा रस्ता धरला. कारण चहलने ७.५ षटकात ख्रिस मॉरिसच्या हातून त्याला झेलबाद केले.
महत्त्वाचे म्हणजे, चहलने सॅमसनची विकेट घेण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही चहलने सॅमसनला तब्बल ४ वेळा बाद केले आहे. सॅमसनविरुद्ध आतापर्यंत चहलने २९ चेंडू टाकत २३ धावा देत इतक्या वेळा सॅमसनला तंबूत धाडलं आहे.
जर राजस्थान रॉयल्सविरुद्ध चहलची आकडेवारी पाहायची झाली, तर त्याने आतापर्यंत राजस्थानविरुद्ध १० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १२.५०च्या सरासरीने गोलंदाजी करताना १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो कोरोनाची लस देखील बनवेल,’ तेवतियाचं मन जिंकणारं क्षेत्ररक्षण पाहून सेहवागचं अनोखं ट्वीट
‘कट रचून दिनेश कार्तिकची कर्णधार पदावरुन हाकालपट्टी’, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ
तूच रे पठ्ठ्या! कोलकाताच्या धुरंदराने केली धोनीच्या ७ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…