---Advertisement---

राशिद खानविरुद्ध तळपली सॅमसनची बॅट, षटकारांची हॅट्रिक केल्यानंतर बनला मोठा विक्रम

Sanju Samson
---Advertisement---

संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (16 एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात शिमरन हेटमायर मॅच विनर ठरला. त्याचसोबत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने दिलेले योगदान देखील महत्वाचे ठरले. राशिद खानविरुद्ध सॅमसनने सलग तीन षटकार मारले आणि एका खास विक्रमाची नोंद आपल्या नावापुढे करून घेतली.

राजस्थानला या सामन्यात विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 19.2 षटकात गाठले. शेवटच्या षटकांमध्ये शिमरन हेटमायर (Shimron Hetmyer) 26 चेंडूत नाबाद 56 धावा कुटल्या आणि राजस्थानला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने 32 चेंडूत 60 धावांची ताबडतोड खेळी केली होती. आयपीएल 2023च्या पहिल्या दोन सामन्यात सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. पण तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्याने शुन्यावर विकेट गमावली होती. हंगामातील पाचव्या सामन्यात मात्र सॅमसनने पुन्हा लयीत दिसला.

रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात सॅमसनने अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याला सलग तीन षटकार मारून हॅट्रिक केली. अशी कामगिरी करणारा सॅसमन आयपीएल इतिहासातील दुसराच खेळाडू ठरला आहे. सॅमसनआधी आयपीएलमध्ये राशिदला तीन किंवा त्यापेक्षा जास्त षटकार लागोपाठ चेंडूवर मारणारा दुसरा कोणी नसून ख्रिस गेल. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये अनेकदा वादळी खेली केली. राशिद खानविरुद्ध एका सामन्यात फलंदाजी करताना गेलने लागोपाठ चार षटकार मारले होते. राशिदविरुद्ध षटकारांची हॅट्रिक करणारा सॅसमन पहिलाच भारतीय ठरला आहे.

सॅमसनच्या वादळी खेळीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. 12व्या षटकानंतर राजस्थानची धावसंख्या 4 बाद 66 धावा होती. पण 13व्या षटकात सॅमसनने तीन षटकार मारल्यानंतर संघाची धावसंख्या अचानक 4 बाद 86 धावा झाला. गुजरातसाठी गोलंदाजी विभागातील मोहम्मद शमी याने 3, तरत राशिद खान याने 2 विकेट्स घेतल्या. (Sanju Samson has become the second batsman to hit a hat-trick of sixes in IPL against Rashid Khan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

अहमदाबादमध्ये सॅमसन-हेटमायरचे तुफान! गुजरातला लोळवत राजस्थान टॉपवर
“गांगुलीला हे सोपे वाटले असेल”, दिल्लीच्या पराभवानंतर भारतीय दिग्गजाकडून कानउघडणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---