भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याच्यावर संघ व्यवस्थापन सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळत आहे. या मालिकेत शानदार प्रदर्शन करत भारतीय खेळाडूंकडे येत्या आशिया चषक आणि टी२० विश्वचषकासाठी संघात जागा मिळवण्याची चांगली संधी आहे. परंतु सॅमसनला स्वतला सिद्ध करण्याची एक संधीही दिली गेली नाही.
भारतीय संघ (Team India) २२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India Tour Of West Indies) आहे. ७ ऑगस्ट रोजी पाचव्या टी२० सामन्यासह या दौऱ्याचा शेवट होईल. या दौऱ्यावर टी२० मालिकेपूर्वी भारतीय संघाने ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळली आहे. या दोन्ही मालिकेसाठी सॅमसनला (Sanju Samson) भारतीय संघात निवडले गेले आहे. परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये फार कमी संधी दिल्या गेल्या आहेत.
केएल राहुलच्या जागी झाली होती सॅमसनची निवड
२७ वर्षीय सॅमसन वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सुरुवातीला निवडल्या गेलेल्या भारतीय संघाला भाग नव्हता. परंतु पुढे केएल राहुलला दुखापत झाल्याने त्याच्याजागी सॅमसनला संघात सहभागी केले गेले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेत शिखर धवनने सॅमसनला खेळण्याच्या संधी दिल्या होत्या. या संधीला दोन्ही हातांनी घट्ट पकडत त्याने ३ सामन्यात ७२ धावा केल्या होत्या. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करत (५४ धावा, ५१ चेंडू) त्याने आपला दावाही मजबूत केला होता.
एकीकडे यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या रिषभ पंत आणि इशान किशन यांना जितक्या संधी दिल्या जातात, तितक्या सॅमसनला मिळालेल्या नाहीत. चांगल्या फॉर्मात असूनही सॅमसनला एकाद-दोन सामन्यात खेळवून बाकावर बसवले जात आहे. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा त्याच्याकडून टी२० विश्वचषकासाठी आपली दावेदारी ठोकण्याची संधी हिरावून घेत आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराटला टी२० विश्वचषकातूनही वगळणार! बीसीसीआयच्या मोठ्या अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य
टी२० क्रमवारीतील आझमची दहशत संपवणार सूर्यकुमार! करावे लागणार ‘हे’ सोपे काम
काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण