संजू सॅमसनला जर तुम्ही थोडेफार जरी ओळखत असाल तर त्याच्या जुन्या मुलाखती पाहा. संजू तुला टीममध्ये घेतलं पण चान्स मिळाला नाही? असा टिपीकल प्रश्न त्याला विचारला जातो. त्यावर अतिशय सभ्य खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजूचं उत्तर असतं, मी कोणत्या लेवलचं क्रिकेट खेळतोय हे महत्त्वाचं नाही. मला ज्या टीममध्ये संधी दिलीये तिथे मी टीमसाठी काहीतरी करुन दाखवेल. माझा बेस्ट देईल. जर मला कुणी संघात निवडलं आणि संधी दिली नाही तर माझ्यात काहीतरी कमी आहे असं मला वाटतं. मी परत त्या कमीवर काम करतो आणि संघात येण्यासाठी प्रयत्न करतो.
जेव्हा जेव्हा क्रिकेटपटूंना संघात संधी दिली जात नाही, तेव्हा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत असतात. पृथ्वी शॉ, सुर्यकुमार यादव किंवा अगदी सर्फराजचं खानच उदाहरण घ्या. परंतू संजू सॅमसन (Sanju Samson) कधी असं करताना दिसला नाही किंवा त्याने कधी आदळआपट केली नाही. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वनडे सिरीजला सुरुवात झाली आणि पहिल्याच वनडेत संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवण्यात आलं. आज वेस्ट इंडिज दौऱ्यावर जेवढे क्रिकेटपटू गेलेत त्यातल्या वेस्ट इंडिज आणि टीम इंडियाच्या प्लेअर्सपेक्षाही संजूचे वनडे ॲव्हरेज जास्त आहे.
गेल्या 18 वनडे इनिंगमध्ये सुर्यकुमार यादवने 18च्या सरासरीने रन्स केलेत. हाच सुर्यकुमार यादव पहिल्या वनडेत संजूची जर्सी घालून मैदानात उतरला होता. कमीत कमी संजू नाही पण त्याची जर्सी तर मैदानात उतरली असं म्हणायची वेळ आली. संजू टीम इंडियात सिलेक्ट तर होतो पण कधी बेंचवर तर कधी पाणी द्यायलाच जास्त दिसतो. त्याच्या जर्सीवर कायम पिवळ्या रंगाची राखीव खेळाडूंची जर्सी असते. आता सुर्यकुमारला कदाचीत आयर्लंड दौऱ्यात रेस्ट दिली जाईल कारण त्याला आशिया कपमध्ये खेळवायच आहे. विंडीज दौऱ्यात त्याने काय केलंय, मागच्या 18 डावांत काय केलंय हे कुणी विचारातही घेणार नाही. गेल्या 9 इनिंगमध्ये शुबमन गीलनेही विशेष दिवे लावले नाहीत. त्याच्या इनिंग तर 20, 0, 37, 13, 18, 6, 10, 29*, 7 अशा राहिल्यात. पण तो देखील आशिया कप खेळेल. बाकी आयर्लंड सिरीजमध्ये ईशान किशनला विश्रांती दिली जाणार आहे. आयर्लंड टुरला ईशान किशनला विश्रांती देणे याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या. इशान किशन (Ishan Kishan) एक विकेटकिपर आहे. ईशानला विश्रांती देणे म्हणजे त्याची जागा आशिया कपमध्ये विकेटकिपर म्हणून पक्की करणे असा होतो.
जे लोकं संजूला चान्स दिला जात नाहीये म्हणून ओरडत आहेत, त्यांची तोंड बंद करण्याचं एक भारी गणित सापडलंय. संजू सॅमसनला आयर्लंड सिरीजमध्ये प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळवलं जाणार. कदाचीत सुर्यकुमार, हार्दिक यांना रेस्ट दिल्यामुळे त्याला कॅप्टनही करतील. पण ज्या खेळाडूला एका बाजूला तुम्ही कॅप्टन करायचा विचार करताय, त्यालाच तुम्ही दुसरीकडे एक चान्स पण देत नाहीत. इथे स्पष्ट दिसतंय की संजूला आशिया कपला संधी देण्याची इच्छा कुणाचीच दिसत नाही.
टीममधल्या इतर खेळाडूंची कामगिरी कशीही झाली तरी फारशी चर्चा होत नाही. कारण बऱ्याच वेळा त्यांची आयपीएलमधील कामगिरी पाहिली जाते. त्यांची नावं मोठी आहेत. सो कॉल्ड स्टार झालेत ते. परंतू त्याचवेळी संजू कामगिरी मोठी असूनही या स्टार नावांपुढे ती कामगिरी टिकत नाही.
13 ऑगस्टला वेस्ट इंडिज दौरा संपतोय, तर 23 ऑगस्टला आयर्लंड दौरा संपतोय. 30 ऑगस्टपासून आशिया कप सुरु होतोय पण यातल्या कोणत्या सिरीजमध्ये संजू टीमचा भाग असेल हे संजूला काय कुणालाच माहित नाही. त्याची कदाचीत निवडही होईल पण प्रत्यक्ष मॅचमध्ये संधी मिळेल का? हाही प्रश्न आहे. 2011 साली डोमेस्टिक क्रिकेटला सुरुवात केलेल्या संजूला 2021 साली पहिल्यांदा वनडेत संधी मिळाली. सातत्यपुर्ण कामगिरी करुनही तो कधीच संघात पर्मनंट झाला नाही. एकतर संधी लेट, त्यानंतर कामगिरी चांगली तरीही संघात जागा नाही, आता निवड होतेय पण चान्स मिळत नाही अशीच काहीशी अवस्था या खेळाडूची झालीय.
संजू आता 28 वर्षांचा आहे. त्यात अजूनही बरंच क्रिकेट बाकी आहे. अशा या प्रतिभावान खेळाडूला संधी न देऊन टीम त्याचं नुकसान करत नाही तर टीम इंडियाचं नुकसान करतेय. सलग काही सिरीज त्याला संधी द्यायला काय हरकत आहे. कदाचीत एक मोठा इंटरनॅशनल स्टार त्यातून समोर येऊ शकतो. देशाला एक चांगला विकेटकिपर बॅट्समन मिळू शकतो. आता तरी त्याच्यासोबत सुरु असलेलं पॉलीटीक्स संपलं पाहिजे. संजू सॅमसनला संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? (Sanju Samson has been ignored by the BCCI. Do you think politics is happening with him?)
महत्वाच्या बातम्या –
टी-20चा सुपरस्टार वनडेत फ्लॉप! सॅमसनला मिळणार संधी? दोघांच्या आकडेवारीत जमीन-आस्मानाचा फरक
ASHES 2023 । पाचव्या कसोटीत इंग्लंडचा तगडा झटका! दिग्गज अष्टपैलू अडचणीत