आयपीएल 2023 मध्ये रविवारी (2 एप्रिल) पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने खेळाच्या तीनही विभागात अप्रतिम कामगिरी करत 72 धावांनी मोठा विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात कर्णधार संजू सॅमसन याची भूमिका निर्णायक राहिली. त्याने आक्रमक अर्धशतक झळकावले. याचबरोबर त्याच्या नावे एक विक्रम ही जमा झाला.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर राजस्थानसाठी सलामीवीर जयस्वाल व बटलर यांनी तुफानी सलामी दिली. दोघांनी पावर प्लेमध्येच 85 धावा कुटल्या. दोघांनी देखील अर्धशतके साजरी केली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन याने मधल्या षटकांमध्ये संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने 32 चेंडूत 55 धावा केल्या. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
संजू 2020 पासून सलग हंगामातील पहिल्या सामन्यात अर्धशतक साजरे करत आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एकदा त्याने शतकाची वेसही ओलांडली. 2020 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 74 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2021 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध 119, 2022 मध्ये हैदराबादविरुद्ध 55 आणि यावेळीही हैदराबादविरुद्ध 55 धावा केल्या.
या सामन्याचा विचार केला गेल्यास राजस्थानने 72 धावांनी मोठा विजय मिळवत विजयी सलामी दिली. राजस्थानच्या विजयाचा पाया सलामीवीर जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी घातला. दोघांनी अर्धशतके झळकावली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन याने देखील 55 धावांची खेळी केली. या तिघांच्या खेळामुळे राजस्थानने 203 धावा उभ्या केल्या.
या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला पहिल्या षटकापासून धक्के बसले. 52 धावांवर त्यांनी 6 गडी गमावले होते. राजस्थानच्या सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत हैदराबादला 131 पर्यंत रोखले. चहलने सर्वाधिक चार बळी मिळवत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेगवान अर्धशतक करणारा बटलर सामनावीर ठरला.
(Sanju Samson Hits Fourth Consecutive 50 Plus Score In IPL Season First Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सनरायझर्सला बोल्टचा झटका! खाते न खोलू देता हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत, पाहा व्हिडिओ
उमरानने ताशी 149.3 किमीच्या गतीने पडिक्कलला टाकला चेंडू, स्टंपने मारल्या कोलांटी उड्या; पाहा Video