इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील पाचवा सामना मंगळवारी (२९ मार्च) पुण्याच्या एमसीए स्टेडिअम येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने गगनचुंबी षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह संजूने दाखवून दिले आहे की, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आपलं नाणं खणखणीतच वाजतं. यासोबतच त्याने एक खास कारनामा केला आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या फलंदाजांनी हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनचा (Kane Williamson) निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने ६ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात २१० धावा केल्या आणि हैदराबाद संघाला २११ धावांचे आव्हान दिले.
FIFTY for @IamSanjuSamson and he brings this up with a Maximum 👏👏
Live – https://t.co/WOQ4HjEIEr #SRHvRR #TATAIPL pic.twitter.com/iju9tddSkb
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2022
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना ५५ धावा ठोकल्या. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडला. यासह त्याने दाखवून दिले की, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात त्याची बॅट तळपतेच. संजूने २०१८पासून आतापर्यंत आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आतिषी खेळी केली आहे. त्याने आयपीएल २०१८च्या पहिल्या सामन्यात ४२ चेंडूत ४९ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याने आयपीएल २०१९मध्ये २५ चेंडूत ३०, आयपीएल २०२०मध्ये ३२ चेंडूत ७४, आयपीएल २०२१मध्ये ६३ चेंडूत विस्फोटक खेळी करत ११९ धावा ठोकल्या होत्या.
संजूची आयपीएल कारकीर्द
संजूच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १२२ सामन्यातील ११८ डावांमध्ये फलंदाजी करताना २९.४६च्या सरासरीने ३१२३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि १६ अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसनच्या बॅटमधून निघालेल्या धावा
४९ धावा- ४२ चेंडू (आयपीएल २०१८)
३० धावा- २५ चेंडू (आयपीएल २०१९)
७४ धावा- ३२ चेंडू (आयपीएल २०२०)
११९ धावा- ६३ चेंडू (आयपीएल २०२१)
५५ धावा- २७ चेंडू (आयपीएल २०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ४०० कोटींची घसरण, तर ‘माही’ने घेतली मोठी झेप
माजी क्रिकेटरने सांगितली पाकिस्तानच्या आझमची आयपीएलमधील किंमत; म्हणाला, ‘तो १५-२० कोटींना…’
आयपीएल म्हणजे पैसे छापण्याचीच मशीन; मीडिया हक्कांमधून बीसीसीआय होणार मालामाल