भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ब्रायन लारा स्टेडियम त्रिनिदाद येथे खेळला गेला. या सामन्यापूर्वी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्याजागी संजू सॅमसन याला भारतीय संघात सहभागी केले गेले. कोरोनातून पूर्णपणे बरा न झाल्याने राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला मुकणार असल्याने संजूला त्याचा पर्यायी खेळाडू निवडण्यात आले आहे. यानंतर आता एका व्हिडिओमुळे संजूची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
संजूने (Sanju Samson) त्याच्यातील माणुसकी दाखवत क्रिकेटजगतापुढे मोठे उदाहरण ठेवले आहे. याचमुळे चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत आहे. एका पत्रकाराने लाईव्ह येत संजूच्या माणुसकीबद्दल (Sanju Offered His Seat To Journalist) सोशल मीडियावर सांगितले आहे. या पत्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करत पत्रकाराने म्हटले आहे की, “आम्ही तसे तर खूप क्रिकेटपटू पाहिले आहेत, जे आम्हाला हात दाखवून निघून जातात. जेव्हा मुलाखतीसाठी विचारतो, तेव्हा मुलाखतही देतात. पण मी आज खासकरून संजू सॅमसनबद्दल बोलेल. तो माझ्यासोबत इथे उभा होता. सहज बोलता बोलता मी त्याला म्हटले की, पोर्ट ऑफ स्पेनमधून पहिल्या टी२० सामन्याचे ठिकाण खूप दूर आहे. तिथे जायला तासभर लागेल. मला येथून तिथे जायला खूप अडचण येईल.”
“यावर संजूने मला मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. त्याने मला भारतीय संघासोबत त्यांच्या टीम बसमध्ये यायला सांगितले. मला सुरुवातीला वाटले की, संजू माझ्यासोबत मजा करतोय. परंतु तो पुढे खूप निरागसतेने मला म्हणाला की, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकत नाही कामी माझी सीट तुम्हाला बसण्यासाठी देतो. संजूने इतक्या प्रेमाने माझी विचारपूस केली. मी त्याचा आणि त्याच्या माणुसकीचा चाहता बनलो आहे,” असे पत्रकाराने पुढे म्हटले.
दरम्यान संजूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार प्रदर्शन केले होते. याचमुळे त्याला टी२० मालिकेतही संधी मिळाली आहे. मात्र पहिल्या टी२० सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यात अयशस्वी ठरला होता. आता पुढील सामन्यांमध्ये त्याला खेळवले जाईल का नाही, हे पाहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शर्माजी पुन्हा टी२०तील ‘टॉपर’, वेस्ट इंडिजविरुद्ध ताबडतोब अर्धशतक करत विश्वविक्रम नावावर
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल
‘टी२० विश्वचषकासाठी आम्ही तयारच, फक्त काही…’ कॅप्टन रोहितचे मोठे विधान