दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने 1-2 अशा अंतराने विजय मिळवला. संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंग हे तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात मॅच विनर ठरले. 2021 मध्ये वनडे पदार्पण करणाऱ्या सॅमसनला गुरुवारी (21 डिसेंबर) या सामन्यात पहिले वनडे शतक करता आले. या अप्रतिम खेळीनंतर सॅमसनने मागच्या चार महिन्यात त्याची मनस्थिती ठीक नव्हते, असा खुलासा केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील हा तिसरा वनडे सामना पर्लमध्ये खेळला होता. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 50 षटकांमध्ये भारताने 8 विकेट्सच्या नुकसानावर 296 धावा केल्या. यात संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या 108 धावांचे योगदान होते. सॅमनने 110 चेंडूंमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक साकारले. तिल वर्मा यानेही 52 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात 297 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेला दक्षिण आफ्रिका संघ 45.5 षटकात सर्वबाद झाला. अर्शदीप सिंग याने 9 षटकांमध्ये 30 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंगटन सुंदर यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना भारताने 78 धावांनी जिंकला. या विजयानंतर सॅमसन माध्यमांसमोर म्हणाला, “मागचे तीन-चार महिने माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक राहिले. त्यामुळे यातून जात असताना आज मी केलेली खेळी, खरोखर आनंद देणारी आहे. मला हा आनंद जाणवत आहे. मला माझ्या रक्तात आशीर्वाद मिळाला आहे. माझे वडील देखील एक खेळाडू होते. त्यामुळे कितीही अपयश मिळाले, तरी पुनरागमन करण्यासाठी संधी असतेच, असे मला वाटते. तुम्ही स्वतःवर किती काम करू शकता आणि कशा पद्धतीने पुनरागमन करू शकता, हा विचार नेहमी केला पाहिजे.”
उभय संघांतील या सामन्यात तिलक वर्मा आणि सॅमसन यांच्यात महत्वाची भागिदारी पार पडली. सॅमसन या भागीदारीविषयी म्हणाला की, “खरं सांगाचयं तर मी धावफलकाकडे पाहत नव्हतो. जोपर्यंत ही भागीदारी झाली नव्हती, तोपर्यंत मी मला फक्त खएळाचे होते आणि मोठी धावसंख्या करायची होती.”
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात संजू सॅमसन याला संधी दिली गेली नाही. सॅमसनची वनडे क्रिकेटमधील सरासरी 55 पेक्षा अधिक असूनही फॉर्ममध्ये तितका चांगला नसताना सूर्यकुमार यादव याला विश्वचषक संघात घेतले गेले. अनेकांनी निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर नाराजीही व्यक्त केली होती. आशिया चषक आणि आशियाई गेम्समध्येही सॅमसन भारतीय संघाचा भाग नव्हता. (Sanju Samson made a big revelation after scoring his maiden international century)
महत्वाच्या बातम्या –
2023 । सरत्या वर्षात दिसला भारतीयांचा जलवा, पाहा कोणत्या पाच खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा
IND vs SA: मोठा खुलासा; ऋतुराज गायकवाड का खेळला नाही तिसरा सामना, समोर आले मोठे कारण