अनेक भारतीयांना वाटते की संजू सॅमसन या कॅप्टन कूल एमएस धोनीनंतर भारतीय संघातील त्याची जागा घेईल. एक प्रतिभावान खेळाडू असलेला सॅमसन यष्टीमागे चपळ तर आहेच परंतु फलंदाजीतही दादा फलंदाज आहे.
परंतु सध्या हा खेळाडू कठीण परिस्थितीतून जात आहे. भारतीय अ संघात निवड झालेला हा खेळाडू यो- यो टेस्टमध्ये फेल झाला आणि या संघातील आपले स्थान गमावुन बसला आहे.
परंतु याच आठवड्यात तो भारताचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार एमएस धोनीला बेंगलोर येथे भेटला. तसेच आपण आपल्या हिरोला भेटल्यावर काय भावना असतात याचा मी आनंद घेत आहे असेही इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटला आहे.
https://www.instagram.com/p/BkPixIPFY5j/?utm_source=ig_embed
वयाच्या ३६व्या वर्षीही धोनी फिटनेस टेस्ट पास होतो तर २३ वर्षीय सॅमसन ही टेस्ट फेल झाला यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. परंतु धोनी- सॅमसन भेटीत सॅमसनने यावर नक्कीच धोनीशी याबद्दल चर्चा केली असेल अशी आशा चाहते नक्कीच करत असतील.
आजच्या महत्त्वाच्या बातम्या-
–आयसीसी म्हणते; आम्हाला माफ करा; आमच्याकडून मोठी चूक घडली!
–महान फलंदाज माहेला जयवर्धने होणार पुन्हा कर्णधार!