---Advertisement---

धक्कादायक! संघनिवडीच्या बैठकीत संजूचे नावही घेतले नाही; बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा

On: बुधवार, सप्टेंबर 14, 2022 4:11 PM
sanju samson
---Advertisement---

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषक 2022 साठी बीसीसीआयने मंगळवारी (12 सप्टेंबर) 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात हा विश्वचषक खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोन्ही यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली आहे. मात्र, तिसरा यष्टीरक्षक संजू सॅमसन याला संघात जागा मिळू शकली. आता निवड समितीच्या बैठकीत घडलेला एक किस्सा बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितला असून, संजूच्या नावाची चर्चा देखील झाली नसल्याचे सांगितले जाते.

निवड समितीच्या बैठकीतील अनेक बाबींचा नुकताच उघगडा झाला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले,

“संजू सॅमसनची बाहेर चर्चा झाली असली तरी, प्रत्यक्ष निवडीवेळी त्याचे नावही घेतले गेले नाही. कार्तिक व पंत यांना संधी मिळणे आधीपासून ठरले होते. सध्या पंत भारतीय फलंदाजी क्रमात डाव्या हाताने खेळणारा एकमेव फलंदाज आहे. तो त्याच्या दिवशी एकहाती सामना पलटवू होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी त्याला संघाबाहेर करण्याचा कोणताही विचार नाही.”

दरम्यान 2015 साली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतरही सॅमसन एकदाही टी20 विश्वचषक खेळू शकलेला नाही. त्याने आतापर्यंत भारताकडून फक्त 16 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान 21.14 च्या सरासरीने त्याने 296 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे. दुसरीकडे दिनेश कार्तिकचा हा तिसरा टी20 विश्वचषक असेल. त्याने 2007, 2010 आणि आता 2022 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळवली आहे. तर पंतचा हा 2021 नंतर दुसराच टी20 विश्वचषक असेल.

टी२० विश्वचषकासाठी अशी आहे १५ सदस्यीय भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि आर अश्विन.
स्टॅंडबाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाने लॉन्च केली नवी जर्सी, पाहा त्यात काय आहे विशेष?
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---