भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आगामी वनडे विश्वचषकापूर्वी 22 सप्टेंबरपासून वनडे मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका भारताला आपल्या मायदेशात खेळायची आहे. सोमवारी (18 सप्टेंबर) कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी या वनडे मालिकेसाठी संघ घोषित केला. विशेष म्हणजे आधी पहिल्या दोन सामन्यांसाठी व त्यानंतर अखेरच्या सामन्यासाठी अशी ही संघ निवड झाली. मात्र, या दोन्ही संघांमध्ये संजू सॅमसन याला स्थान मिळाले नाही.
संजू सॅमसन हा मागील काही काळापासून भारतीय संघाचा सदस्य होता. वर्षाच्या सुरुवातीला तो पाचव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत. त्यानंतर टी20 संघात तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका देखील बजावली. श्रेयस अय्यर व केएल राहुल दुखापतग्रस्त असताना, त्याने वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत संघातील आपले स्थान कायम ठेवले होते. मात्र, या दोघांनी पुनरागमान केल्यानंतर त्याची संघातील जागा गेली.
आशिया चषक स्पर्धेसाठी त्याचा राखीव म्हणून संघात समावेश केला गेला होता. मात्र, राहुल श्रीलंकेत पोहोचल्यानंतर तो पुन्हा मायदेशी परतला. तसेच एशियन गेम्ससाठी देखील त्याची निवड झाली नव्हती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील पहिल्या दोन वनडेसाठी त्याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे तो एशियन गेम्स, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका तसेच विश्वचषक या कोणत्याच स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
श्रेयस अय्यर याच्या फिटनेसवर अद्यापही प्रश्नचिन्ह असल्याने त्याच्या जागी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष असेल. सध्या तरी या जागेसाठी तिलक वर्मा याला निवडसमिती व कर्णधाराची पसंती असल्याचे दिसते. त्यामुळे संजू याला संधी न मिळण्याची दाट शक्यता आहे.
(Sanju Samson Not Part Of Any Sqaud Of India In Asian Games Australia Series And World Cup)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज