वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांच्या या मालिकेत 1-2 अशा अंतराने विजय मिळवला. दुसऱ्या वनडेत अपयशी ठरलेला संजू सॅमसन सामन्यात भारतीय संघासाठी अर्धशतकाचे योगदान देऊ शकला. ईशानने या अर्धशतकी खेळीनंतर खास प्रतिक्रिया देखील दिली.
उभय संघांतील या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि 50 षटकात 351 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तार वेस्ट इंडीज संघ अवघ्या 151 धावांवर 36व्या षटकात सर्वबाद झाला. शुमबन गिल, ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी महत्वपूर्ण खेळी केलीच. पण संजू सॅमसनचे अर्धशतक देखील महत्वपूर्ण ठरले. सॅमसनने 41 चेंडूत 2चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. त्याने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मात्र सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळला होती आणि अवघ्या 9 धावा करून बाद झाला होता. त्याआधी मालिकेतील पहिल्या वनडेसाठी सॅमसनला संघात स्थान मिळाले नव्हते.
Sanju 🔛 song! 👌 👌
This has been a cracking half-century ⚡ ⚡
Follow the match ▶️ https://t.co/boUPUpFuSr#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/7xvqyRN5Dq
— BCCI (@BCCI) August 1, 2023
याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या वनडेतील विजयानंतर सॅमसन माध्यमांशी बोलताना म्हणाला, “एक भारतीय क्रिकेटपटू बनणे मोठे आव्हानचे काम आहे. मी मागच्या 8-9 वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेट आणि भारतासाठी विदेशात आणि मायदेशात खेळलो आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्रमांकावर खेळण्याचा अंदाज आला आहे. हे फलंदाजाला मिळणाऱ्या षटकांबाबत हे आहे, फलंदाजांच्या क्रमाचा जास्त फरक पडत नाही. त्यामुळे फलंदाजांना परिस्थितीनुसार तयारी करावी लागेल.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले. मुकेशने 3, तर शार्दुलने चार विकेट्स घेतल्या. त्याआधी सलमीला आलेल्या ईशान किशन आणि शुबमन गिल यांनी अनुक्रमे 77 आणि 85 धावांची खेळी केली. संजू सॅमसन सह हार्दिक पंड्याने महत्वपूर्ण भागीदारी पार पाडली. हार्दिकने 70 धावांची खेळी. (sanju samson on his half century against west indies 3rd odi)
महत्वाच्या बातम्या –
ईशानचा टॉप फॉर्म कायम! सलग चौथ्या सामन्यात फोडली विंडीजची गोलंदाजी
सांघिक विजय! तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडीज 200 धावांनी पराभूत, मालिका भारताच्या नावावर