---Advertisement---

संजूच्या यष्टीरणाची बात काही औरच! चित्यासारखी चपळता दाखवत एका हाताने घेतला झेल

On: शनिवार, ऑगस्ट 20, 2022 3:06 PM
Sanju-Samson-catch
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन हा दिवसेंदिवस त्याच्या यष्टीरक्षण कौशल्यात प्रगती करताना दिसत आहे. सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात संजूला प्रमुख यष्टीरक्षक म्हणून जागा देण्यात आली आहे. अशात त्याने या सामन्यांमध्ये यष्टीमागे चपळता दाखवत प्रभावित केले आहे. शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही त्याने यष्टीमागे एका हाताने अप्रतिम झेल टिपला आहे. त्याच्या या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

झिम्बाब्वेविरुद्धच्या (India vs Zimbabwe) दुसऱ्या वनडे सामन्यात सॅमसनने (Sanju Samson) यष्टीमागे जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने या सामन्याच्या सुरुवातीला ३ भन्नाट झेल घेतले. त्यातही त्याने झिम्बाब्वेचा सलामीवीर तकुज्वानशे कायतानो याला झेलबाद करण्यासाठी टिपलेला झेल आकर्षणाचा विषय ठरत आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा डावातील नववे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीवीर कायतानोने हलक्या हाताने आऊटसाईट एजला चेंडू मारला. यावेळी यष्टीमागे सतर्क असलेल्या सॅमसनने त्वरित डाव्या बाजूला डाईव्ह मारली आणि एका हाताने अचूक झेल (Sanju Samson One Handed Catch) टिपला. अशाप्रकारे कायतानो अवघ्या ७ धावांवर बाद झाला आणि भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली.

https://twitter.com/cric_roshmi/status/1560905517794336771?s=20&t=Yo_DXMUW-1uMHvPqm9gt8A

याबरोबरच सॅमसनने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इनोसेंट काइया याचाही यष्टीमागे झेल घेतला. काइया १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सॅमसनने वेस्ले माधवेरे याचाही यष्टीमागे झेल घेतला. हा झेल त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर घेतला.

असे आहेत दोन्हीही संघ-

भारतीय संघ-
शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज

झिम्बाब्वे संघ-
इनोसंट कैया, ताकुडझ्वानाशे कायतानो, वेस्ली मधेवेरे, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रेगिस चाकाब्वा (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्याउची, तनाका चिवांगा

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Second ODI: मॅच विनिंग प्रदर्शनानंतरही दीपक चाहरला का बसवलं बाकावर? कारण आले पुढे

२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना

आताची लहान पोरंही फाडफाड इंग्लिश बोलतात! तोडक्यामोडक्या इंग्रजीमुळे आझमचं होतंय हसू, तुम्हीही पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---