---Advertisement---

असं कोण करतं भावा? नाणेफेकीवेळी संजू सॅमसनने केलं असं काही, केएल राहुलसह रेफरीही अचंबित

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 3:04 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मागील १२ हंगामात चषक जिंकण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आयपीएल २०२१ मध्ये युवा संजू सॅमसनला देण्यात आली. त्याने कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकली. परंतु नाणेफेकीच्या वेळी त्याने असे काही कृत्य केले, जे पाहून सामनाधिकारी आणि पंजाबचा कर्णधार केएल राहुल देखील आश्चर्यचकित झाला होता.

युवा संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. परंतु त्याला पहिल्यांदा राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाणेफेकिचा कौल राजस्थान रॉयल्स संघाच्या दिशेने लागला होता. राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु नाणेफेकी झाल्यानंतर, संजू सॅमसनने ते नाणे उचलून आपल्या खिशात टाकल्याचे दिसून आले. हे पाहून सामनाधिकारी, समालोचक आणि केएल राहुल आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यासोबतच अनेक चाहते यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाब किंग्ज संघाकडून सलामी फलंदाज केएल राहुल याने ९१ धावांची वादळी खेळी केली. यात त्याने ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्यानंतर ख्रिस गेल याने २८ चेंडूत ४० धावांची खेळी केली. तसेच दीपक हुड्डा याने अवघ्या २८ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि ६ षटकार लगावले.

राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची आवश्यकता होती. सलामीला आलेल्या बेन स्टोक्स (शून्य धावा) आणि मनन वोहरा (१२ धावा) यांनी संघाला हवी तशी सुरुवात करून दिली नाही. बटलरने २५ धावांची खेळी केली तर शिवम दुबेने २३ धावा केल्या. यासोबतच रियान परागने २५ धावांचे योगदान दिले. तर संजू सॅमसनने एकहाती झुंज देत ११९ धावांची खेळी केली. तरीसुद्धा शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसन बाद झाला आणि राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना ४ धावांनी गमावला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘साड्डा पंजाब हार्ट अटॅक देणं बंद करणार नाही,’ पंजाब किंग्जच्या विजयानंतर संघ मालकिणीची प्रतिक्रीया

हे पोरग भारीय, त्याला संधी देऊन पाहा; जेव्हा ‘या’ भारतीय क्रिकेटरने द्रविडकडे केली होती संजूची शिफारस

चेतन सकारियाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय दिग्गजाचं भावनिक ट्विट; म्हणाले, ‘भावाच्या आत्महत्येची..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---