आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे युएई मध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेचे भारतात पुनरागमन होते आहे. त्यामुळे चाहत्यांसह खेळाडू देखील यासाठी उत्सुक असतील.
यंदाच्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन या युवा खेळाडूला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. या नव्या जबाबदारीपूर्वी राजस्थान रॉयल्सच्या वेबसाईटशी बोलतांना एक महत्त्वाचे विधान केले आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या बाबतीत त्याने हे विधान केले आहे.
धोनीची केली स्तुती
संजू सॅमसनने यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व करणारा एमएस धोनीची स्तुती केली. तो म्हणाला, “मला नाही वाटतं की कोणी धोनीची जागा घेऊ शकेल. तो अतिशय दुर्मिळ खेळाडू आहे. त्यामुळे मी त्याच्या सारखा होण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही. मी माझ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करेल.”
यावर्षी जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य
मागील हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. मात्र यंदा ते विसरून नव्या दमाने या हंगामात उतरण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे यावेळी सॅमसनने स्पष्ट केले. तो म्हणाला, “कठीण काळात आम्हाला साथ देणार्या चाहत्यांचे मी आभार मानतो. यंदाच्या हंगामात त्यांच्या चेहर्यावरील हसू परत आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे या हंगामात निश्चितच अधिक चांगली कामगिरी आमच्याकडून होईल.”
आयपीएल २०२१ची सुरुवात ९ एप्रिलपासून होणार आहे. पहिला सामना गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये खेळवला जाईल. तर राजस्थान रॉयल्सचा संघ आपला पहिला सामना १२ एप्रिलला पंजाब किंग्ज विरूद्ध खेळेल.
महत्वाच्या बातम्या:
आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळले, पण हा कारनामा करणारा एबी डिविलियर्स एकमेवच
आयपीएल २०२१ साठी बंगलोरच्या ताफ्यात या खास व्यक्तीची झाली नेमणूक
आनंद गगनात मावेना! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने हॉटेल रुमच्या बाहेरच हरभजनचा भांगडा