आतापर्यंत जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १३ पर्व यशस्वीरित्या पार पडले आहेत. यानंतर ही लीग लवकरच चौदाव्या पर्वात प्रवेश करणार आहे. ९ एप्रिल रोजी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामन्याने या पर्वाचा श्रीगणेशा होणार आहे. नवा कर्णधार संजू सॅमसन याच्या नेतृत्त्वाखालील आयपीएलचा राजस्थान रॉयल्स संघ यंदा नव्या अपेक्षांसह मैदानावर उतरणार आहे.
तत्पुर्वी सॅमसनने राजस्थानचा कर्णधार बनताच त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. आपण राजस्थानचा संघनायक म्हणून नियुक्त होताच आयपीएलमधील दिग्गज कर्णधारांनी संदेश पाठवत आपले मनोबल उंचावल्याचे त्याने सांगितले आहे.
एका मुलाखतीत बोलताना सॅमसन म्हणाला की, “राजस्थान संघाने आयपीएल २०२१ साठी माझी कर्णधारपदी नियुक्ती केली. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, याबरोबरच कुमार संगकारा अशा दिग्गजांनी मला वैयक्तिक संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या. प्रत्येकाने त्यांच्या परीने माझा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले.”
राजस्थान रॉयल्स दुसऱ्या जेतेपदाच्या प्रतिक्षेत
सॅमसनची आयपीएल कारकिर्द प्रशंसनीय राहिली आहे. गतवर्षी राजस्थान रॉयल्सकडून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सॅमसनला यंदा संघनायक बनवण्यात आले आहे. आयपीएल २०२१ लिलावात राजस्थान संघाने माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला मुक्त केले होते. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनवर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजस्थान संघाने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र त्यांना एकदाही चषक जिंकला आला नाही. अशात मागील १२ हंगामापासून आयपीएल जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या अपेक्षांवर संजू सॅमसन खरा उतरतो का नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम
नुसता पैसा! एका सामन्यातून आयपीएल कमावते ८१ कोटी, सीएसके नाही तर ‘हा’ संघ आहे सर्वात धनाढ्य