भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा सोमवारी 25 वा वाढदिवस होता. त्यामुळे त्याचा वाढदिवस भारतीय संघाने रविवारी रात्री बांगलादेश विरुद्धची 3 सामन्यांची टी20 मालिका जिंकल्यानंतर वाढदिवस साजरा केला.
रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर येथे भारत विरुद्ध बांगलादेश संघात तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेचा शेवटचा सामना पार पडला. भारताने हा सामना 30 धावांनी जिंकून मालिका 2-1 ने काबीज केली. या मालिकेसाठी युवा खेळाडू संजू सॅमसनचादेखील भारतीय संघात समावेश होता. परंतु, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
रविवारी त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रशनवेळी भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तिथे होते. संजू जेव्हा केक कापून रोहितला केक चारण्यासाठी रोहितचा शोध घेत होता तेव्हा तिथे उभे असलेल्या खेळाडूंनी युजवेंद्र चहलच्या चेहऱ्यावर केक फेकण्यास त्याला सांगितले.
संजूने थोडावेळ वाट पाहत केक चहलच्या चेहऱ्यावर फेकला, त्यानंतर चहल हातात केक घेऊन संजूच्या मागे पळाला.
https://www.instagram.com/p/B4svwEYFnrE/
या सेलिब्रेशनचा व्हिडिओ संजूनेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने या सेलिब्रेशनच्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘चहलच्या चेहऱ्यावर मार, आणि मी जे मला सांगितले ते मी केले. हे खास बर्थ डे सेलिब्रेशन होते. सर्वांना धन्यवाद’
रणवीर सिंगच्या 'नटराज शाॅट'वर कपिल देव म्हणतात…
वाचा- 👉https://t.co/I0sHGEqBus👈#म #मराठी #KapilDev #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019
बांगलादेश विरुद्ध शानदार कामगिरी करणारे श्रेयस अय्यर, शिवम दुबे आता खेळणार या स्पर्धेत!
वाचा 👉 https://t.co/AIAtdFh1DA 👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 12, 2019