---Advertisement---

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सॅमसनचे जबरदस्त शतक! रेलवेविरुद्ध एवढे षटकार मारले, पण…

Sanju Samson
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमनस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याआधी सॅमसन देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे. केरळ संघाच्या कर्णधाराच्या रुपात त्याने मंगळवारी (5 डिसेंबर) आपल्या संघासाठी अप्रतिम शतकी खेळी केली. पण संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

मंगळवारी बेंगलोरमध्ये केरळ आणि रेलवे यांच्यात हा रोमांचक सामना खेळला गेला. रेलवेने 18 धावांनी केरळवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना रेलवेने 5 विकेट्सच्या नुकसानावर 255 धावा केल्या. प्रत्युत्तरात केरळ संघाने 50 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 237 धावांपर्यंत मजल मारली. संजू सॅमसन (Sanju Samson) याने केरळसाठी 139 चेंडूत 128 धावा कुटल्या. या अप्रतिम खेळीमध्ये 8 चौकार आणि 6 षटकारही होते. दक्षिण आफ्रिकी दौऱ्यात चाहते सॅमसनला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्याआदीच सॅमसनकडून चाहत्यांना ही धमाकेदार खेळी भेट म्हणून मिळाली.

असे असले तरी, रेलवेच्या युवराज सिंग (Yuvraj Singh) याने केलेली 121 धावांची खेळी सॅमसन त्याच्या संघाला विजय मिळवून देणारी ठरली. 136 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारून त्याने या धावा केल्या होत्या. त्याचसोबत प्रथम सिंग यानेही 61 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. दुसरीकडे केरळसाठी सॅमसनच्या साथीने श्रेयस गोपाल यानेही 53 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. केरळला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पण सॅमसनचे सर्वत्र कौतुक होत आहे. संघातील इतर फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावत असताना कर्णधाराची ही खेळी संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत घेऊन गेली. विजय हजारे ट्रॉफीमधील सॅमसनच्या सर्वोत्तम प्रदर्शनांपैकी ही एक खेळी असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय संघ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे, ज्याठिकाणी टी-20, वनडे आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. 17 ते 21 डिसेंबर यादरम्यान होणाऱ्या वनडे मालिकेसाठी सॅमसनला संधी दिली गेली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात त्याला निवडले गेले नव्हते. अशात सॅमसनकडे संघातील आपले महत्व सिद्ध करण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौरा ही मोठी संधी असेल. चाहते या मालिकेत सॅमसनकडून अशाच फॉर्मची अपेक्षा ठेवून आहेत.

(Sanju Samson scored an incredible century for Kerala while playing against Railways)

महत्वाच्या बातम्या – 
मिचौंग चक्रिवादळादरम्यान लोकल बॉय अश्विनचा चेन्नई शहराला खास मेसेज, मराठमोठा रहाणे म्हणाला…
मिस्ट्री स्पिनर जोमात, फलंदाज कोमात! वरुण चक्रवर्तीने 9 धावा खर्चत घेतल्या 5 विकेट्स, नागालँड फक्त…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---